BCCI Invites Applications For New Title Sponsor : आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ स्पॉन्सर शिवायच मैदानात उतरणार का? अशी चर्चा रंगत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे मुख्य प्रायोजक हक्क मिळविण्यासाठी नामांकित कंपन्यांकडून निविदा मागविण्याची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने नव्या करारासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ मुळे ड्रीम इलेव्हनचा खेळ खल्लास झाला असून त्यानंतर आता या शर्यतीत कोण कोण दिसणार ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI नं या कंपन्यांसाठी लावली नो एन्ट्रीची पाटी
BCCI नं अधिकृत एक्स अकाउंटवरुन यासंदर्भात माहिती देताना महत्त्वपूर्ण अटही घातलीये. मद्य, तंबाखू, जुगार, रियल मनी गेमिंग (फँटेसी स्पोर्ट्स गेमिंग सोडून), क्रिप्टोकरन्सी आणि पोर्नोग्राफीशी संलग्नित असलेल्या आणि सार्वजानिक नैतिकता न जपणाऱ्या कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला प्रायोजकत्व हक्क मिळवण्यासाठी अर्ज करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख बीसीसीआयने केला आहे. संबंधित निविदा भरण्याची अखेरची तारीख १२ सप्टेंबर असून बोली लावण्याची अखेरची तारीख १६ सप्टेंबर असल्याचीही माहितीही देण्यात आलीये.
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
असा आहे BCCI चा नव्या स्पॉन्सरशिपसंदर्भातील प्लॅन
NDTV नं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय २०२५ ते २०२८ पर्यंत १४० सामन्यांसाठी नवा जर्सी प्रायोजक शोधत आहेत. नव्या स्पॉन्सरसोबतचा करार हा देशांतर्गत आणि परदेशी द्विपक्षी सामन्यासह आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि आयसीसीच्या स्पर्धेतील सामन्यांसाठी असेल. द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी ३.५ कोटी आणि आयसीसी आणि ACC च्या सामन्यासाठी प्रत्येकी १.५ कोटी असं लक्ष बीसीसायने ठेवले आहे.
आशिया कप आधी शक्य नाही, पण महिला वनडे वर्ल्ड पर्यंत डील पक्की
ड्रीम इलेव्हनसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर आशिया कपपर्यंत भारतीय संघाच्या जर्सीवर नव्या प्रायोजकाचं नाव दिसेल, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील होते. पण वेळ खूपच कमी असल्यामुळे ते शक्य नाही. ज्या तारखा दिल्या आहेत त्यावरूनही आशिया कप आधी ही डील होणार नाही, हे स्पष्ट होते. पण महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी मात्र नव्या करार पक्का होईल, अशी चित्र दिसून येत आहे.
Web Title: BCCI Announces The Release Of The Invitation For Expression Of Interest For National Team Lead Sponsor Rights But
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.