Join us  

BCCI central contracts: वार्षिक करार यादी जाहीर; अय्यर-किशनला डच्चू, अनेक युवा खेळाडूंना गिफ्ट

बीसीसीआयने २०२३-२४ ची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 5:54 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२३-२४ ची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. A+ श्रेणीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर अ श्रेणीमध्ये आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचा समावेश आहे. ब श्रेणीमध्ये सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांना स्थान मिळाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारातून वगळण्यात आले आहे. 

तसेच निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा या खेळाडूंसाठी वेगवान गोलंदाजी कराराची शिफारस केली आहे. A+ श्रेणीमध्ये ४, अ श्रेणीमध्ये ६, ब श्रेणीमध्ये ५ आणि क श्रेणीमध्ये १५ खेळाडूंना स्थान मिळाले आहे. 

बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. २०२३-२४ साठी जाहीर झालेल्या या यादीत श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची नावे नाहीत. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही. यामुळे बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला. त्याचा परिणाम करार यादीत दिसून आला. उत्तर प्रदेशातील डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला क श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अ+ श्रेणीमध्ये आहेत.

  • ग्रेड A+ - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
  • ग्रेड A - आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.
  • ग्रेड ब - सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
  • ग्रेड क - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जे खेळाडू किमान ३ कसोटी किंवा ८ वन डे सामने अथवा १० ट्वेंटी-२० सामने खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतात त्यांना प्रमाणित कालावधीत आपोआप क श्रेणीमध्ये सामाविष्ट केले जाईल. उदाहरणार्थ, ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनी आतापर्यंत २ कसोटी सामने खेळले आहेत, मग त्यांनी धर्मशाला कसोटी सामन्यात भाग घेतल्यास त्यांचा क श्रेणीमध्ये समावेश होईल. खरं तर करारानुसार खेळाडूंच्या मानधनाचा आलेख हा ७, ५, ३ , १ कोटी असा आहे. पण बीसीसीआयने उल्लेख केलेला नाही. या रकमेत वाढ होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. 

टॅग्स :बीसीसीआयइशान किशनश्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघ