Join us
Daily Top 2Weekly Top 5

India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 05:07 IST

Open in App

BCCI  Announced Ayush Mhatre Lead India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup 6 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. U19 आशिया कप स्पर्धेतील फायनलमधील पराभवानंतरही ICC च्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने  सेम पॅटर्नसह १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वावर भरवसा कायम ठेवला असून उप कर्णधारपदाची जबाबदारी ही विहान मल्होत्राकडे सोपवण्यात आली आहे. पण दुखापतीमुळे हे दोघेही अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी रंगणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार आहेत, अशी माहितीही बीसीसीआयने दिली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन भारत 'ब' गटात!  

झिम्बाब्वे आणि नामिबीया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत एकूण १६ संघांचा सहभाग आहे. या संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरी, सुपर सिक्स फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना अशा पद्धतीने १५ जानेवारी २०२६ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. युवा भारतीय  संघाने आतापर्यंत २०००, २००८, २०१२, २०१८, २०२२  पाच वेळा जेतेपद पटकावले असून भारतीय संघ  'ब' गटात न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश या संघासोबत खेळताना दिसेल.

मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी

भारतीय संघ साखळी फेरीत सामने कधी आणि कुणाविरुद्ध खेळणार?

भारतीय संघ १५ जानेवारीला अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला  सुरुवात करेल.  त्यानंतर साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ १७ जानेवारीला बांगलादेशविरुद्ध आणि २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसेल. हे सर्व सामने  बुलवायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात नियोजित आहेत.

ICC अंडर-१९ विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी भारताचा संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर. एस. अंब्रिश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उधव मोहन.

English
हिंदी सारांश
Web Title : India U19 World Cup Squad Announced: Same Pattern Continues

Web Summary : BCCI announced India's U19 World Cup squad, sticking with the same team despite Asia Cup loss. Ayush Mhatre captains, Vihan Malhotra is vice-captain, both miss South Africa series due to injury. India, five-time champions, will play in Group B.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयुष म्हात्रेवैभव सूर्यवंशी