Haris Rauf Catch Video BBL 2025: ऑस्ट्रेलियाची टी२० स्पर्धा बिग बॅश लीगचा नवीन हंगाम जोरात सुरू आहे. आतापर्यंत त्यात काही आश्चर्यकारक सामने तसेच काही धक्कादायक घटना पाहायला मिळाल्या आहेत. मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यातील सामन्यादरम्यान अशीच एक घटना घडली. या घटनेत खेळाडू दुखापतग्रस्त होता-होता वाचला. स्टार पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि ऑस्ट्रेलियाचा हिल्टन कार्टराईट या घटनेत सामील होऊ शकले असते, परंतु नशिबाने त्यांना साथ दिली आणि ते थोडक्यात बचावले.
रविवारी BBL 2025 च्या १४व्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले. सिडनी थंडर प्रथम फलंदाजी करत होते. त्यांच्या डावातील शेवटचे षटक होते. टॉम करन गोलंदाजी करत होता. थंडरच्या फलंदाजाने त्याच्या षटकातील चौथा चेंडू हवेत मारला. चेंडू बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पॉइंटमध्ये गेला. पॉइंट फील्डर हॅरिस रौफने झेल घेण्यासाठी धाव घेतली आणि मोठी दुर्घटना टळली. सीमारेषेवर तैनात असलेला कार्टराईटही कॅच घेण्यासाठी धावला. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी येत होते. दोघांनी डाइव्ह मारली आणि ते एकमेकांवर आदळले असते, पण तसे घडले नाही. त्यामुळे मैदानावर मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, ही दुर्घटना टळली, त्यासोबत झेलही सुटला. कारण कार्टराईटने हॅरिस रौफला पाहिल्यावर त्याने वेगळ्या दिशेला उडी घेतली. अशातच दोघांमध्ये टक्कर झाली नाही पण फलंदाजाला एक धाव मिळाली.