ठळक मुद्देमुंबई इंडियन्स-सनरायजर्स हैदराबाद यांच्यात युद्धचेन्नई सुपर किंग्जने धोनीचा फोटो केला पोस्टधोनीच्या एका फोटोमुळे मुंबई-हैदराबादची बोलती बंद
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन कट्ट प्रतिस्पर्धी आहेत आणि या दोन्ही संघांचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. 2019च्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सोशल मीडियावर श्रेष्ठत्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यांच्या या सोशल वॉरचा नेटीझन्सनेही मनसोक्त आनंद लुटला. मात्र, या चर्चेत जेव्हा चेन्नई सुपर किंग्जने उडी घेतली त्यावेळी मुंबई व हैदराबाद संघांची बोतली बंद झाली.
नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 मालिकेतील विंडीज संघाचा सदस्य किरॉन पोलार्ड मायदेशी परतण्याआधी पांड्या भावंडांची भेट घेतली. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि पोलार्ड हे तिघेही आयपीएलमध्येमुंबई इंडियन्सकडून खेळतात. हार्दिकने कृणाल व पोलार्डसह काढलेला सेल्फी ट्विट केला. ''पोलार्डचा फोटो घेण्यासाठी मला माझा फोन बराच वरती उचलावा लागत आहे,'' असे हार्दिकने फोटो शेअर करताना लिहिले.
मुंबई इंडियन्स संघाने हा फोटो रिट्विट करताना यापेक्षा चांगले अष्टपैलू शोधून दाखवा, आम्ही प्रतीक्षा करतो, असे लिहिले.
या ट्विटवर सनरायजर्स हैदराबादने हार्दिक पांड्याला प्रत्युत्तर देताना रशिद खान, मोहम्मद नबी आणि बांगलादेशच्या शकिब अल हसनचा फोटो ट्विट केला. त्यापुढे त्यांनी तुमची प्रतीक्षा संपली.. असे उत्तर दिले.
ही लढाई येथेच थांबली नाही. मुंबईने
आयपीएलच्या तिन्ही ट्रॉफी शेअर करताना, प्रतीक्षा संपलेली नाही, असे लिहिले.
मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे, तर सनरायजर्स हैदराबादने एकदाच चषक उंचावला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने वादात उडी घेतली आणि दोघांना गप्प केले.
चेन्नईने ट्विटरवर महेंद्रसिंग धोनीचा फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याने Moondru Mugam असे लिहिले. त्याच्या अर्थ त्रिमुर्ती असा होता.