Join us

बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखीच : दिनेश कार्तिक

अनेक फलंदाजांना स्वत:ची बॅट पसंत नसते. त्यांना फलंदाजीसाठी दुसऱ्याची बॅट हवी असते. बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 05:34 IST

Open in App
ठळक मुद्देअनेक फलंदाजांना स्वत:ची बॅट पसंत नसते. त्यांना फलंदाजीसाठी दुसऱ्याची बॅट हवी असते. बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी आहे.

लंडन : ‘बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखीच असते. दुसऱ्याची बॅट इतर खेळाडूंना अधिक आवडते,’ असे वक्तव्य यष्टिरक्षक- फलंदाज दिनेश कार्तिक याने इंग्लंड - श्रीलंका सामन्यादरम्यान स्काय स्पोर्ट्‌सवर समालोचनादरम्यान केले. कार्तिकच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बॅटबद्दल त्याने गमतीशीर वक्तव्य करताच अनेकांना हसू आवरणे कठीण झाले होते. कार्तिकचा टोला मुरली विजयला असावा. विजयने कार्तिकची पहिली पत्नी विजया हिच्यासोबत लग्न केले आहे.

‘अनेक फलंदाजांना स्वत:ची बॅट पसंत नसते. त्यांना फलंदाजीसाठी दुसऱ्याची बॅट हवी असते. बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी आहे. इतरांना ती खूप आवडते,’ असे कार्तिकने उच्चारताच सहकारी समालोचकही हसले. कार्तिकच्या समालोचनातील हा किस्सा व्हायरल होत आहे. 

टॅग्स :दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघ