बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार, मुश्ताक अली-टी-२० अंतिम लढत आज

Mushtaq Ali-T20 final : अनुभवी खेळाडूंचा समावेश अशलेला तामिळनाडू संघाला सैयद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी बडोद्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 07:15 IST2021-01-31T05:19:06+5:302021-01-31T07:15:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Baroda-Tamil Nadu to battle for title, Mushtaq Ali-T20 final today | बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार, मुश्ताक अली-टी-२० अंतिम लढत आज

बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार, मुश्ताक अली-टी-२० अंतिम लढत आज

अहमदाबाद : अनुभवी खेळाडूंचा समावेश अशलेला तामिळनाडू संघाला सैयद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी बडोद्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बडोदा संघाने मैदानाबाहेरील वाद विसरून शानदार कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू संघाचा युवा व अनुभवी खेळाडूंमुळे समतोल साधल्या गेला आहे. साखळी फेरीत आतापर्यंत त्यांनी अनेक मोठ्या फरकाने विजय नोंदवले आहे. त्यामुळे संघात कुठली उणीव दिसली नाही.

दुसऱ्या बाजूचा विचार करता केदार देवधरच्या नेतृत्वाखालील बडोदा  संघाने अनेक एकतर्फी विजय नोंदवले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी हरियाणाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या रोमांचक लढतीत विजय नोंदवला. त्यात विष्णू सोलंकीने अखेरच्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट खेळत विजय मिळवून दिला होता. बडोदा संघाची कामगिरी यासाठी अधिक प्रशंसनीय आहे कारण त्याचा अव्वल फलंदाज दीपक हुड्डा कृणाल पांड्यासोबत वाद झाल्यामुळे संघ सोडून गेला होता. त्यानंतर वडिलांच्या निधनामुळे कृणाला जावे लागले. कर्णधार कार्तिकने मोठी खेळी केली नाही, पण लक्ष्याचा पाठलाग करताना मधल्या फळीत त्याने उपयुक्त योगदान दिले आहे. शाहरुख खान कामगिरीत सातत्य राखत पुढील महिन्यात आयपीएलच्या लिलावापूर्वी संघांचे लक्ष वेधण्यात उत्सुक आहे.

 हिमाचल प्रदेशविरुद्ध तामिळनाडू संघही अडचणीत होता, पण शाहरुख खानची शानदार फलंदाज व बाबा अपराजितची संयमी खेळी यामुळे त्यांना विजय मिळविता आला. अनुभवी के. बी. अरुण कार्तिकने राजस्थानविरुद्ध ८९ धावांची शानदार खेळी केली होती. सलामीवीर फलंदाज एन जगदीशन (३५० धावा) याने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर त्याचा सहकारी सी. हरी निशांतने चांगल्या सुरुवातीनंतर फॉर्म गमावला.
 

Web Title: Baroda-Tamil Nadu to battle for title, Mushtaq Ali-T20 final today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत