Bangladeshi Players End Boycott BPL Resumes : बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आणि खेळाडूंच्या कल्याण संघटना यांच्यात सहमती झाल्यानंतर बंडखोरी करणाऱ्या बांगलादेशी क्रिकेटपटूंनी खेळाच्या व्यापक हिताचा विचार करत बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) स्पर्धेवर टाकलेला बहिष्काराचा मुद्दा बाजूला सोडून पुन्हा मैदानात उतरण्यास तयार झाले. बांगलादेशी वरिष्ठ खेळाडूंनी बीसीबीचे संचालक नजमुल इस्लाम यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ बंड पुकारले होते. त्यामुळे बोर्डची प्रमुख टी-२० लीग स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली. बांगलादेशच्या बोर्डाने नजमुल इस्लाम यांची पदावरुन उचबांगडी करताच बांगलादेशी खेळाडूंनी पुन्हा स्पर्धेत खेळण्यास राजी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् स्थगित झालेली स्पर्धा पुर्ववत सुरु झाली
क्रिकेटर्स वेलफेअर असोसिएशन ऑफ बांगलादेश (CWAB) चे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या हितासाठी काही मुद्द्यांवर तडजोड करावी लागली. मिथुन म्हणाले, “क्रिकेटच्या व्यापक हिताचा विचार करून आम्ही शुक्रवारपासून पुन्हा खेळणार आहोत. गुरुवारी बीपीएलचे दोन सामने स्थगित करण्यात आले होते. या निर्णयानंतर शुक्रवारपासून स्थगित झालेली स्पर्धा पुन्हा सुरु झाली आहे.
"टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार..." वादग्रस्त वक्तव्य भोवलं; BCB च्या बड्या पदाधिकाऱ्याला दणका
भारतीय मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न खेळण्याचा मुद्दा अन् वादग्रस्त वक्तव्य
नजमुल इस्लाम यांनी ‘सुरक्षा कारणां’चा हवाला देत पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात जाण्यास बांगलादेशने नकार दिला असल्याची भूमिका पुन्हा मांडली. तसेच, बांगलादेशच्या संघाने या स्पर्धेतून माघार घेतल्यास खेळाडूंना कोणत्याही प्रकारची भरपाई दिली जाणार नाही, असे ते म्हणाले होते. आतापर्यंत बांगलादेशनं कधीच स्पर्धा जिंकलेली नाही, असा उल्लेख त्यांनी केला होता. हा मुद्दा बांगलेदशच्या खेळाडूंना खटकला अन् खेळाडूंनी थेट देशांतर्गत लीग स्पर्धेवरच बहिष्का टाकला.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासंदर्भात तिढा सोडवण्यासाठी शिजतोय हा प्लॅन
भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात बीसीबी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सोबत चर्चा करत आहे, जेणेकरून या पेचातून मार्ग काढता येईल. आयसीसीने भारतात होणारे बांगलादेशचे चार सामने श्रीलंकेत स्थलांतरित राजी नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे एक प्रतिनिधीमंडळ बांगलादेशचा दौरा करू शकते. द डेली स्टारच्या वृत्तानुसार, क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी गुरुवारी फॉरेन सर्व्हिस अकॅडमीमध्ये माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे नेमका काय तोडगा निघणार ते पाहण्याजोगे असेल.