Join us

T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!

बांगलादेशने आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:47 IST

Open in App

Bangladesh's T20 World Cup squad : बांगलादेशने आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अलीकडेच त्यांनी मायदेशात झिम्बाब्वेविरूद्ध ४-१ ने मालिका जिंकली. निवडकर्त्यांनी विश्वचषकाच्या संघात २२ वर्षीय शोरिफुल इस्लामला संधी दिली आहे. तर अफिफ हुसैन आणि हसन महमुद हे दोघे राखीव खेळाडू म्हणून संघाचा हिस्सा असतील. पुढील महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाणार आहे.

बांगलादेश विश्वचषकासाठी ड गटात असून, या गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड्स आणि नेपाळच्या संघाचा समावेश आहे. बांगलादेश श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. हा सामना ७ जून रोजी होणार आहे. 

विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ -नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्य सरकार, तन्जीद हसन तमीम, शाकीब अल हसन, Tawhid Hridoy, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, तन्जीद हसन साकीबराखीव खेळाडू -  अफिफ हुसैन, हसन महमुद. 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024बांगलादेशटी-20 क्रिकेट