Join us

Asia Cup 2025, BAN vs HK Head To Head Record : 'डेथ ग्रुप' अन् 'डेंजर झोन'मधील लढत; जाणून घ्या सविस्तर

जर लिंबू टिंबू संघाने उलटफेर करत बांगलादेश किंवा श्रीलंकेला दणका दिला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 02:03 IST

Open in App

BAN vs HK Head To Head Record When And Where Watch Asia Cup 2025 3rd Match : आशिया चषक स्पर्धेतील 'ब' गटातील बांगलादेशचा संघ हाँगकाँग विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गुरुवारी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर या दोन्ही संघातील लढत खेळवण्यात येणार आहे. सलामीच्या सामन्यात हाँगकाँगच्या संघाला अफगाणिस्तानकडून पराभवाचा धक्का बसला आहे. पण बांगलादेशचा संघ या लिंबू टिंबू संघाला हलक्यात अजिबात घेणार नाही. कारण त्यांना या संघाने इंगा दाखवला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 'डेथ ग्रुप' अन् 'डेंजर झोन'मधील लढत; कारण...

आशिया कप स्पर्धेतील 'अ' गटात भारत आणि पाकिस्तान या दोन संघासाठी सुपर फोरमध्ये एन्ट्री मारण सहज सोपे आहे. कारण या गटात उर्वरित दोन संघामध्ये यूएई आणि ओमान हे संघ आहेत. दुसरीकडे 'ब' गटात बांगलादेशसह अफगाणिस्तान आणि गत चॅम्पियन श्रीलंकेसोबत हाँगकाँग संघाचा समावेश आहे. या गटातील लढाई ही तिघांमध्ये दोन स्थानासाठी रंगत आहे. त्यामुळेच प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. जर लिंबू टिंबू संघाने उलटफेर करत बांगलादेश किंवा श्रीलंकेला दणका दिला तर त्या संघाचे सुपर फोरमध्ये एन्ट्री मारण्याचं गणित बिघडू शकते. त्यामुळे बांगलादेश अन् हाँगकाँग यांची लढतीला एक वेगळ महत्त्व प्राप्त होते.   

Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

एक मॅच झाली त्यात बांगलादेशवर हाँगकाँगचा संघ पडला होता भारी

याआधी ११ वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये बांगलादेश आणि हाँगकाँग या दोन संघात टी-२० सामना खेळवण्यात आला होता. या एकमेव सामन्यात हाँगकाँगच्या संघाने बांगलादेशला दणका दिला होता. २० मार्च २०१४ मध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या  लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशचा  संघ १०८ धावांत आटोपला होता. लो स्कोअरिंग मॅचमध्ये हाँगकाँगच्या संघाने २ विकेट्स राखून विजय नोंदवला होता.

बांगलादेशचा  संघ 

लिटन दास (कर्णधार), तंजीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हृदोय, जेकर अली, शमीम हुसैन, नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन.

हाँगकाँग संघ

यासिम मुर्तजा (कर्णधार), बाबर हयात, जीशान अली, निजाकत खान, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएट्जी, अंशुमन रथ, कल्हण चल्लू, आयुष शुक्ला, ऐजाज खान, अतीक इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून अरशद, अली हसन, शाहिद वासिफ, मोहम्मद गजनफर, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान.

BAN vs HK यांच्यातील Live मॅच कुठं पाहता येईल?

भारतीय प्रमाण वेळेनुसार, रात्री ८ वाजल्यापासून BAN vs HK यांच्यातील सामन्याचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून होईल. क्रिकेट चाहते टेलिव्हिजनवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चॅनेलवर या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. ऑनलाइन Live स्ट्रीमिंगसाठी सोनी Liv ॲप किंवा या वेबसाइटच्या माध्यमातून देखील क्रिकेट चाहत्यांना आपल्या मोबाइलवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल. लोकमत.डॉट कॉमच्या माध्यमातूनही आम्ही तुम्हाला सामन्यासंदर्भातील अपडेट्स देणार आहोत. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपबांगलादेश