Join us  

भारतामध्ये तिसऱ्या सामन्यात झाली चेंडूशी छेडछाड; कोण आहे खेळाडू, जाणून घ्या...

ही घटना तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात घडल्याचे आता सर्वांसमोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 11:45 AM

Open in App

मुंबई : स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण क्रिकेट विश्व अजूनही विसरू शकलेले नाही. पण वर्षभरात पुन्हा एकदा तसाच प्रकार क्रिकेट वर्तुळात पाहायला गेला आहे. हा प्रकार भारतामध्ये घडला आहे आणि तो व्हिडीओमध्ये कैद झाला असून तो चांगलाच वायरलही झाला आहे. त्यामुळे या दोषी खेळाडूवर आयीसीसी किती वर्षांची बंदी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही घटना तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात घडल्याचे आता सर्वांसमोर आले आहे.

चेंडूशी छेडछाड करण्याची गोष्ट भारतामध्ये घडल्याचे आता पुढे येत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नुकतीच ट्वेन्टी-२० मालिका झाली. या मालिकेत भारताने बांगलादेशवर २-१ असा विजय मिळवला होता. नागपूर येथे झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली होती. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ही गोष्ट घडल्याचे दिसत आहे.

सध्याच्या घडीला भारतामध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्येही ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना नुकताच पार पडला. यापूर्वी वेस्ट इंडिजने ही या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. पण या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरनने चेंडूशी छेडछाड केल्याचे दिसत आहे. या गोष्टीचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. 

टॅग्स :वेस्ट इंडिजअफगाणिस्तानभारत विरुद्ध बांगलादेश