Join us

Ball tampering : क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पैशांची चणचण भासणार; प्रायोजकांनी साथ सोडली

मॅगेलन या कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे प्रायोजकत्व मिळवले होते. पण मॅगेलनने तात्काळ आपला करार रद्द केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी ते प्रायोजक नसतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:05 IST

Open in App
ठळक मुद्देआता अॅशेस मालिकेसाठी प्रायोजतक्व मिळवताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ येणार आहेत.

सिडनी : दक्षिण आफ्रिकेतील चेंडूशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंवर कडक कारवाई करण्यात आली, पण आता या घटनेचा फटका क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही बसला आहे. मॅगेलन या कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे प्रायोजकत्व मिळवले होते. पण या साऱ्या प्रकरणानंतर मॅगेलनने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाबरोबरचा आपला तात्काळ करार संपुष्टात आणला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियावर काय परिणाम होणारऑगस्ट 2017 मध्ये मॅगेलन या कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाबरोबर तीन वर्षांचा करार केला होता. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भरघोस रक्कम मिळाली होती. पण मॅगेलनने तात्काळ आपला करार रद्द केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी ते प्रायोजक नसतील. त्याचबरोबर आगामी अॅशेस मालिकेसाठी नवीन प्रायोजक मिळवणे कठिण होऊन बसले आहे. त्यामुळे आता अॅशेस मालिकेसाठी प्रायोजतक्व मिळवताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ येणार आहेत.

प्रायोजकांनी काय सांगितलंमॅगेलन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हमिश डगलस यांनी सांगितले की, " ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने केलेले कृत् हे खेळाला काळीमा फासणारे आहे. त्यांच्या या कृत्यामुळे आमचे नावालाही बट्टा लागू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांच्या कसोटी संघाचे प्रायोजकत्व तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. "

वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांनाही फटकाचेंडूशी छेडछाड करण्यात अग्रभागी असलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्रॉफ्ट यांनाही जोरदार फटका बसला आहे. कारण खेळाचे साहित्य बनवणाऱ्या एसिक्स या कंपनीने या दोघांबरोबरचे करार रद्द केले आहेत.

टॅग्स :चेंडूशी छेडछाडडेव्हिड वॉर्नर