ब्रेकिंग न्यूज! रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत; तात्काळ मैदान सोडले

दुखापतीनंतर रोहितने लगेचच मैदान सोडल्याचेही समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:42 IST2019-11-01T16:39:30+5:302019-11-01T16:42:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Bad News! Rohit Sharma injured during practice; Immediately left the field | ब्रेकिंग न्यूज! रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत; तात्काळ मैदान सोडले

ब्रेकिंग न्यूज! रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत; तात्काळ मैदान सोडले

नवी दिल्ली : भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माला सराव करताना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. दुखापतीनंतर रोहितने लगेचच मैदान सोडल्याचेही समोर येत आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिला ट्वेन्टी-20 सामना नवी दिल्लीला होणार आहे. या सामन्याच्या सरावासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरला होता. पण यावेळी सराव करताना रोहितला दुखापत झाली असून भारतीय संघासाठी ही वाईट बातमी आहे.

रोहित नेट्समध्ये सराव करत होता. तेव्हा एक चेंडू त्याच्या डाव्या मांडीवर आदळला. हा फटका एवढा जोरदार होता की, रोहितने तिथून बाहेर पडणे उचित समजले. त्यानंतर रोहितने दुखापतीवर बर्फ लावला. ही दुखापत कमी होत नसल्याने त्याने थेट मैदान सोडले. ही दुखापत किती गंभीर स्वरुपाची आहे, हे अजून समजू शकलेले नाही.

दिल्लीतील ट्वेन्टी-20 सामन्यावर कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान
 दिल्लीमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये 3 नोव्हेंबरला पहिला ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी बीसीसीआयकडे बऱ्याच जणांनी केली आहे. आता या वाद-विवादामध्ये भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने उडी घेतली आहे.

आज बांगलादेशच्या संघाने स्टेडियममध्ये कसून सराव केला. सराव करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी मास्क लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिल्लीमध्ये एकही सामना खेळवू नये, असे मत व्यक्त केले होते. आता या सामन्याबद्दल रोहित शर्माने एक मोठे विधान केले आहे.

यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना याच मैदानात खेळवण्यात आला होता. आता बांगलादेशबरोबर ट्वेन्टी-20 सामनाही होणार आहे. या सामन्याबद्दल रोहित म्हणाला की, " भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना या मैदानात यशस्वीपणे खेळवला गेला होता. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धचा सामनाही यशस्वीपणे पार पडेल. हा सामना खेळताना आम्हाला कोणतीही समस्या जाणवणार नाही."

Web Title: Bad News! Rohit Sharma injured during practice; Immediately left the field