Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॅड न्यूज! जसप्रीत बुमराला दुखापत; कसोटी मालिकेला मुकणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 17:10 IST

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आहे. भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. पण कसोटी मालिकेत मात्र तो खेळणार होता. पण आता त्याला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही.

बुमराच्या पाठीला फ्रॅक्चर झाल्याचे समजते आहे. पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. या दुखापतीवर पहिल्यांदा त्याच्यावर उपचार केले जातील. दुखापतीतून सावरल्यावर त्याचे पुनर्वसन केले जाईल आणि त्यानंतर फिटनेस टेस्ट पास केल्यावर त्याला संघात स्थान दिले जाईल. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक पाहता बुमराला लगेच खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापन घेणार नाही. बुमराच्या जागी कसोटी संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका