भारतीय संघाचा स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेससंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्यावर मैदानाबाहेर जाण्याची वेळ आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपर्यंत तो फिट होऊन संघात परतेल, अशी सर्वांना आशा आहे. पण सध्या जी माहिती समोर येत आहे त्यानुसार बुमराहला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तो संघासोबत दिसणार की संघाबाहेर पडणार? असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासंदर्भात सस्पेन्स
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही १९ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी १८ जानेवारी किंवा १९ जानेवारीला टीम इंडियाची घोषणा होईल, असे बोलले जाते. त्याआधी बुमराहच्या खेळण्याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. विश्रांतीनंतर तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बंगळुरु स्थिती सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये जावे लागू शकते.
टीम इंडियासह भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढवणारी बातमी
टाइम्स ऑफ इंडियानं सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, "बुमराह पुढच्या आठवड्यात बंगळुरुस्थित CEO मध्ये जाऊ शकतो. पण अद्याप यासंदर्भातील तारीख पक्की नाही. पाठीच्या दुखापतीतून रिकव्हर होण्यासाठी अन् डॉक्टरांनी त्याला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. याआधी पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्याच्या फिटनेससंदर्भात समोर येणारी माहिती टीम इंडियासह तमाम क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढवणारी आहे.
अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजीलाच उतरला नव्हता बुमराह
ऑस्ट्रेलिलाय विरुद्धच्या पाच सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमराहने सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली होती. ५ सामन्यातील ९ डावात त्याने ३२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. अखेरच्या सिडनी कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीनं त्रस्त असल्यामुळे दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजीही करता आली नव्हती. परिणामी टीम इंडियाची बॉलिंग लाइनअप कमकुवत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी तो रिकव्हर झाला नाही, तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.