'Babar Azam will become Pakistan's PM if...': भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आणि India vs Pakistan मेगा फायनलचे स्वप्न, स्वप्नच राहिले. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात रविवारी १३ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. पाकिस्तानने २००९ आणि इंग्लंडने २०१० मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. आता दोन्ही संघ दुसऱ्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्याच्या निर्धाराने मेलबर्न क्रिकेट मैदानावर उतरणार आहे
पाकिस्तानचे दुसऱ्यांचा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगणार? ICC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
पाकिस्तानने १९९२मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता आणि तोही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने इंग्लंडवर २२ धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा PAK vs ENG समोरासमोर आले आहेत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना १९९२च्या पुनरावृत्तीचे स्वप्न पडत आहे. त्याला कारणही तसेच आहे. १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवासाप्रमाणेच पाकिस्तानचा २०२२ वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास राहिला आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर फेकले जाण्याची टांगती तलवार होती. पण, ते कसेबसे उपांत्य फेरीत पोहोचले आणि तेथे न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरी गाठली.
१९९२मध्ये इम्रान खान कर्णधार होते आणि आता बाबर आजम आहे. या दोघांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील सारखाच प्रवास पाहून आता बाबर आजम पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल असा तर्क लावला जात आहे. केवळ फॅनच नव्हे, तर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही तसं भाकित वर्तविले आहे. ''पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला, तर २०४८मध्ये बाबर आज पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकतो,''असे गावस्कर म्हणाले.
१९९२मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इम्रान खान यांनी १९९६ मध्ये निवृत्ती जाहीर केली आणि पाकिस्तान तहरीक ए इन्साफ ( PTI) या पक्षाची स्थापना केली. २२ वर्षांनंतर २०१८मध्ये ते पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान बनले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"