Join us

अफगाणिस्तानविरूद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान सतर्क; न्यूझीलंडविरूद्ध उतरवला तगडा संघ

Pak vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:39 IST

Open in App

pak vs nz ODI and T20 series। नवी दिल्ली : न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा झाली आहे. कालच वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. अशातच यजमान पाकिस्तानने संघ जाहीर केला असून अनेक वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी यांचे पुनरागमन झाले आहे. अलीकडेच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत शादाब खानच्या नेतृत्वात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. 

दरम्यान, न्यूझीलंडचा संघ ९ एप्रिलला पाकिस्तान दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. किवी संघ पाकिस्तानच्या धरतीवर सर्वप्रथम ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळेल आणि त्यानंतर वन डे मालिका खेळवली जाईल. आगामी दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. कारण किवी संघाचे बऱ्यापैकी खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत. त्यामुळेच पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या किवी संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. टॉम लॅथम ट्वेंटी-२० आणि वन डे दोन्ही मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. 

न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फरीम अशरफ, फखर झमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इहसनुल्लाह, इमाद वसीम, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, झमान खान. 

न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुला शफिक, फखर झमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इहसनुल्लाह, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उसामा मीर. 

पाकिस्तानविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ - टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, चाड बोव्हेस, मॅट हेनरी, बेन लिस्टर, कोले मॅक्काशी, ॲडम मिल्ने, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, हेनरी निकोल्स, रचिन रवींद्र, हेनरी शिप्ले, इश सोधी, ब्लेअर टिकनर आणि विल यंग. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडबाबर आजमआयपीएल २०२३आंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App