Join us

Arjun Tendulkar IPL 2023: बाप से बेटा सवाई! पहिल्यांदा फलंदाजी मिळाली अन् अर्जुन तेंडुलकरने सचिनला टाकलं मागे

Arjun Tendulkar Sachin Tendulkar Mumbai Indians, IPL 2023: पदार्पणापासूनच अर्जुन तेंडुलकर सतत काही ना काही कारणाने चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 13:29 IST

Open in App

 Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2023: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन गेल्या आयपीएल सीझनमध्ये बेंचवर बसला असतानाही चर्चेत होता. आता तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11चा भाग बनताना दिसतोय. प्रत्येक सामन्यात तो काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. कधी आयपीएल पदार्पणामुळे, कधी पहिल्या विकेटमुळे, कधी एका षटकांत ३१ धावा दिल्यामुळे... पण आता तो चर्चेत आलाय ते IPLमधील पहिल्या गोलंदाजीमुळे... अर्जुन तेंडुलकरचे वडील सचिन तेंडुलकर एक महान फलंदाज. सचिनने मोठमोठे विक्रम केले, पण एका गोष्टीत मात्र अर्जुनने आपल्या वडिलांना मागे टाकले.

अर्जुन तेंडुलकरला प्रथमच आयपीएलमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. गुरुवारी (२५ एप्रिल) रात्री गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १८व्या षटकात पियुष चावला बाद झाला. यानंतर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर बॅट घेऊन मैदानात उतरला. त्याने 9 चेंडूत 13 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने षटकारही मारला. 20व्या षटकात तो मोहित शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण मैदानाबाहेर पडण्यापूर्वी त्याने पदार्पणाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या धावसंख्येपेक्षा एक पाऊल पुढे टाकले.

सचिन तेंडुलकरने आयपीएल 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात फलंदाजी करताना तो केवळ 12 धावा काढून बाद झाला. म्हणजेच अर्जुनने आयपीएलच्या पदार्पणात वडिलांपेक्षा एक धावा जास्त केल्या. यापूर्वी अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतली होती, तेव्हाही त्याने सचिनपेक्षा वरचढ कामगिरी केली होती. खरे तर सचिनने आयपीएलचे ६ सीझन खेळले आणि भरपूर गोलंदाजी केली पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत अर्जुनला विकेट मिळाल्यावर सचिन म्हणाला होता की, अखेर आयपीएलमध्ये कोणत्या तरी तेंडुलकरच्या नावावर विकेट नोंदवली गेली. अर्जुनने आयपीएल पदार्पणासह एक विक्रमही केला. सचिन आणि अर्जुन ही आयपीएल खेळणारी पहिली पिता-पुत्र जोडी ठरली होती.

टॅग्स :आयपीएल २०२३अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स
Open in App