Ayush Mhatre Will Lead Mumbai Team In Buchi Babu Tournament : आयपीएलच्या १८ व्या हंगामात CSK च्या ताफ्यातून लेट एन्ट्री मारुन लक्षवेधी ठरलेला १७ वर्षीय आयुष म्हात्रेला मुंबई संघाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर अंडर १९ संघाचे नेतृत्व केल्यावर आता तो तामिळनाडूतील बुची बाबू स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या स्पर्धेत मुंबईकर 'बडे मिया छोटे मिया' जोडी अर्थात सरफराज खान आणि मुशीर खान विरारच्या पठ्ठ्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयुष म्हात्रेची भरारी
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं आयपीएलच्या १८ व्या हंगामात साखळी फेरीतील शेवटच्या टप्प्यात CSK कडून जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत पदार्पण केले. लेट एन्ट्री मारल्यावर त्याने आपल्या भात्यातील तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत सर्वांचेच लक्षवेधून घेतले. त्याच्यातील हीच चमक बघून इंग्लंड दौऱ्यावरील अंडर १९ संघाचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर आले. आता देशांतर्गत क्रिकेटमधील आणखी एका स्पर्धेत तो आपल्या फलंदाजीतील कौशल्यासह नेतृत्व गुण दाखवून देताना दिसेल. १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान रंगणाऱ्या स्पर्धेत मुंबईचा संघ कशी कामगिरी करतोय ते पाहण्याजोगे असेल.
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
बुची बाबू स्पर्धेसाठी असा आहे मुंबईचा संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), मुशीर खान, दिव्यांश सक्सेना, सरफराज खान, सुवेद पार्कर (उप-कर्णधार), प्रगनेश कानपिलेवार, हर्ष आघव, साई राज पाटील, आकाश पार्कर, आकाश आनंद (विकेटकीपर/ बॅटर), हार्दिक तामोर, श्रेयस गुरव, यश डिचोलकर, हिमांशु सिंह, रोस्टन डियास, सिलवेस्टर डीसूजा, इरफान उमेर.
इंग्लंड दौऱ्यावर कशी राहिली होती आयुष म्हात्रेची कामगिरी
भारतीय १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व करताना इंग्लंड दौऱ्यावर युथ वनडेत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. ४ डावात त्याने फक्त २७ धावाच केल्या. पण युथ टेस्टमध्ये बेस्ट कामगिरी करत त्याने वनडेतील कसर भरून काढली होती. दोन शतकासह त्याने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली.
Web Title: Ayush Mhatre Will Lead Mumbai Team In Buchi Babu Tournament Sarfaraz Khan Mushir Khan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.