चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान हा हाय होल्टेज सामना रविवार होत आहे. हा सामना दुबईमध्ये खेला जाणार आहे. भारतीय संघ शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ यांचा सामना करण्याची तयारी करत आहेत. विशेषतः शाहीन अफ्रीदीसाठी त्यांनी यूएईच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची मदत घेतली आहे. भारत 2021 च्या टी-20 विश्व चषकानंतर पाकिस्तानसोबत सातत्याने विजय मिळवत आहे. मात्र, या सामन्यासंदर्भात चाहत्यांमध्ये चितेचे वातावरण आहे. भारतीय संघ यावेळीही 2021 च्या टी-20 विश्व चषकाप्रमाणे ग्रुप स्टेजमध्ये आहे. पाकिस्तान आणि न्यूझिलंड विरुद्ध सुरुवातीच्या पराभवानंतर भारत अडचणीत येऊ शकतो. खरे तर, इंग्लंड विरुद्ध 3-0 ने विजय मिळवल्याने भारतीय संघाचे मनोबल निश्चित पणे उंचावलेले आहे.
यापूर्वीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी टोर्नामेन्टमधील सामना दुबई येथेच झाला होता. 2021 टी-20 विश्व चषकात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. हा 29 वर्षांनंतर पाकिस्तानचा पहिला विजय होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा तीन विश्वचषक सामन्यात पराभव केला आहे.
शाहीन आफ्रिदीनेचे आव्हान भारतीय संघाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. चार वर्षांपूर्वी दुबईमध्येच शाहीनने रोहित शर्माला गोल्डन डक, केएल राहुलला एका धावेवर आणि विराट कोहलीला ५७ धावांवर बाद केले होते. २०२३ च्या आशिया चषकात शाहीनने ३५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या, तेव्हाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
शाहीन आफ्रिदीचा सामना करण्यासाठी, भारतीय संघाने नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी यूएईच्या स्थानिक डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला बोलावले आहे. या गोलंदाजाचे नाव आहे अवैस अहमद आहे. अवैस अहमद हा युएईचा स्थानिक क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो खैबर पख्तूनख्वाच्या नसीम शाह जिल्ह्यातील आहे. खरेतर, त्याच्या प्रशिक्षकाला एक एसएमएस आला होता की, त्यांच्यकडे एका डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासंदर्भात विचारणा करण्यात आली. यानंतर, प्रशिक्षकांनी अहमदला यासंदर्भात माहिती दिली आणि विराट कोहली तसेच रोहित शर्माला गोलंदाजी करायची आहे, असे त्याला सांगितले.
महत्वाचे म्हणजे अवैस इनस्विंग आणि आउटस्विंग अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करू शखतो. यामुळे त्याचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या 5 सामन्यांचा विचार करता रोहित शर्माचा संघ 4-1 ने आघाडीवर आहे. खरे तर, त्रिकोणी मालिकेत उपविजेता राहिलेल्या पाकिस्तान संघाला कमी लेखता येणार नाही. हा सामना अत्यंत रोमांचक होणे अपेक्षित आहे.