Join us

Glenn Maxwell : नव्या पाहुण्याचं आगमन! ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा; पत्नी विनीनं रमननं दिली खुशखबर

Glenn Maxwell Became Father : ग्लेन मॅक्सवेल बाबा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:30 IST

Open in App

Glenn Maxwell Vini Raman Blessed With Baby boy : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बाबा झाला आहे. त्याची पत्नी विनी हिने एका मुलाला जन्म दिला आहे. मॅक्सवेलची पत्नी विनीने मुलाची काही झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिचा आणि मॅक्सवेलचा हातही दिसत आहे. मॅक्सवेल-विनीच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही अभिनंदन केले आहे.

दरम्यान, मॅक्सवेल आणि विनी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर करत ते आई-वडील झाल्याचे सांगितले. विनी आणि मॅक्सवेल यांनी मुलाचे नावही ठेवले आहे. चिमुकल्याचे नाव 'लोगान मॅव्हरिक मॅक्सवेल' असे ठेवण्यात आले आहे. अनुष्का शर्मासह युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने देखील अभिनंदनाची कमेंट केली आहे. 

मॅक्सवेल आणि विनीची प्रेमकहाणी १८ मार्च २०२२ रोजी हे जोडपं विवाहबंधनात अडकले. २०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा केला. अँचोरमॅन 2@ क्राऊन येथे त्यांची पहिली डेट झाली. ग्लेन मॅक्सवेलने विनीला पहिल्यांदा तिथे I Love you म्हटले होते. खरं तर भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. विनीने ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील Mentone Girls Secondary College मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले. मॅक्सवेल व विनी यांच्या लग्नाच्या पार्टीत RCBच्या खेळाडूंनी खूप धम्माल मस्ती केली. विराट कोहली बिनधास्त नाचताना दिसला होता.

टॅग्स :ग्लेन मॅक्सवेलआॅस्ट्रेलिया