Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या बेनक्राफ्टने केली चेंडूसोबत छेडछाड

आॅस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्ट आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी मान्य केले आहे. आज तिस-या कसोटी सामन्या दरम्यान त्यांनी चेंडूसोबत छेडखानी केली. बेनक्राफ्ट चेंडूला पिवळी वस्तु लावत असल्याचे टेलिव्हिजन कॅमेरात दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 02:45 IST

Open in App

केपटाऊन - आॅस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्ट आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी मान्य केले आहे. आज तिस-या कसोटी सामन्या दरम्यान त्यांनी चेंडूसोबत छेडखानी केली. बेनक्राफ्ट चेंडूला पिवळी वस्तु लावत असल्याचे टेलिव्हिजन कॅमेरात दिसले.बेनक्राफ्ट याने सांगितले की, मी चुकीच्या वेळी चुकीच्या जागी उभा होतो.मी माझ्या कृत्यासाठी उत्तर देऊ इच्छितो.’स्मिथ याने सांगितले की,‘ नेतृत्वाला याबाबत माहित होते. मी आपल्या कृत्यावर खेद व्यक्त करतो.’  स्मिथ  हा कर्णधारपद सोडणार नाही.पंच नियोल लांग आणि रिचर्ड इलिंगवर्थ  यांनी दक्षीण आफ्रिकेच्या दुस-या डावात ४३ व्या षटकांत बेनक्राफ्टसोबत चर्चा केली.  क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या हातात एक वस्तु पाहिली गेली. त्यानंतर पंचांनी त्याला जाब विचारला.पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.

टॅग्स :चेंडूशी छेडछाडआॅस्ट्रेलिया