Join us  

डेव्हिड वॉर्नरची वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्ती! नववर्षाच्या सुरुवातीलाच केली मोठी घोषणा

कसोटीला आधीच ठोकलाय रामराम, पाकिस्तान विरूद्ध ३ ते ७ जानेवारी खेळणार शेवटची टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 10:59 AM

Open in App

David Warner retires from ODI Cricket: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध 2023 चा विश्वचषक अंतिम सामना हा त्याचा शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. तसेच ३ जानेवारीपासून तो देशासाठी शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. पाकिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना हा डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटमधील अंतिम कसोटी सामना असेल, ज्याची घोषणा त्याने ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप दरम्यान केली होती.

फॉक्स क्रिकेटच्या म्हणण्यानुसार, डेव्हिड वॉर्नरने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या निरोपाच्या कसोटी सामन्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंतिम कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना वॉर्नर म्हणाला की, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कसोटीतून निवृत्ती घेण्यासोबतच तो वन डे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचे त्याने सांगितले. जर ऑस्ट्रेलियाला 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सलामीच्या फलंदाजाची गरज असेल तर तो तसे करण्यास तयार आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला परदेशात फ्रेंचायझी क्रिकेट खेळण्याची अधिक संधी मिळेल. हाच त्याचा मानस आहे. पण तो अद्याप T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल काहीही बोलला नाही, कारण वेस्ट इंडिज आणि USA मध्ये होणारा T20 विश्वचषक ही त्याची शेवटची स्पर्धा असेल हे त्याने फार पूर्वीच स्पष्ट केले आहे.

वॉर्नरची वनडे कारकीर्द

डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने 161 सामन्यांच्या 159 डावांमध्ये एकूण 6932 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १७९ धावा आहे. त्याने 45 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून 22 शतके आणि 33 अर्धशतके झाली आहेत. त्याने 733 चौकार आणि 130 षटकारही मारले आहेत.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरऑफ द फिल्डआॅस्ट्रेलियापाकिस्तानवन डे वर्ल्ड कप