Join us

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप, संघातून काढलं बाहेर 

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटवर बलात्काराचा आरोप झाला आहे.  त्यामुळे संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 16:18 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील क्रिकेटवर बलात्काराचा आरोप झाला आहे.  त्यामुळे संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला काउंटी क्रिकेट क्लबचा खेळाडू अॅलेक्स हेपबर्नवर बलात्काराचा आरोप झाला आहे. 21 वर्षीय हेपबर्नसोबतच वोस्टरशायर टीमचा डॉयरेक्टर स्टीव रोड्सवर देखील आरोप झाला आहे. 

21 वर्षीय अष्टपैलू अॅलेक्स हेपबर्नवर नऊ नोव्हेंबर रोजी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले. त्याला आता निलंबित करण्यात आल्याचे वॉरसेसटशायर क्रिकेट क्लबच्या कोचनं सांगितले. याआधी देखील हेपबर्नवर बलात्काराचे आरोप झाले आहेत. क्लबने म्हटलं की, हेपबर्नला पहिल्यांना बलात्काराच्या गुन्हात एक एप्रिलला अटक झाली होती. त्यानंतर त्याने स्टीव रोड्सला संपर्क केला. ही गोष्ट लपवण्यासाठी दोघांमध्ये सहमती झाली. यावर चौकशी अजून सुरु आहे. सध्या या दोघांना संघातून बाहेर करण्यात आलं आहे.

इएसपीएन क्रिकेटनं दिलेल्या वृत्तानुसार, एक एप्रिल 2017 ला अष्टपैलू अॅलेक्स हेपबर्नविरोधात बलात्काराच्या 2 घटना समोर आल्या होत्या. वॉरसेसटशायर क्रिकेट क्लबच्या कोचने म्हटलं की,  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड याबाबत पुष्टी करतो की, स्टीव रोड्स प्रमुख कोच म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ नयेत. रोड्सच्या जागी रिचर्ड डॅवस्न यांना पाठवण्यात येणार आहे. 

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलियाकौंटी चॅम्पियनशिप