Join us  

डेव्हिड वॉर्नरची ग्रँड एन्ट्री, चक्क हेलिकॉप्टर उतरवले मैदानावर! Video viral

सोशल मीडियावर डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 1:06 PM

Open in App

David Warner Viral Video : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटी आणि वन डे क्रिकेटला रामराम केले आहे. मात्र, तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये मैदानावर झळकणार असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. पाकिस्तानविरूद्ध त्याने कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. सध्या वॉर्नर एक भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे त्याची रॉयल एन्ट्री, सोशल मीडियावर डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वॉर्नरचे चक्क हेलिकॉप्टरमधून मैदानात आगमन होते. 

डेव्हिड वॉर्नरच्या ग्रँड एन्ट्रीचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये वॉर्नरने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. दमदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सिडनी क्रिकेट स्टेडियमवर बिग लॅश लीगमधील सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर या सामन्यांमध्ये खेळणार आहे. 

या व्हायरल व्हिडीओमधून थेट आपल्या भावाच्या लग्नातून वॉर्नर मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, वॉर्नरने BBL सामना खेळण्यासाठी मैदानावर चक्क हेलीकॉप्टर घेऊन आल्याचे पाहायला मिळते आहे. मैदानाच्या मधोमध हेलिकॉप्टरमधून उतरत वॉर्नरने हवा केली आहे. हे तेच ठिकण आहे, ज्या ठिकाणी त्याच्या करिअरच्या शेवटच्या कसोटीत डावात 'थँक्यू डेव्ह' असे लिहिले होते.

पाहा व्हिडीओ -

वॉर्नरची वन डे कारकीर्द :

डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियासोशल व्हायरल