टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धूरा मिळाल्यावर काही तासांत मिचेल मार्शनं वादळी खेळीसह आपल्यातील धमक दाखवून दिली आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी २० लीग स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) संघाकडून मैदानात उतरलेल्या मार्शनं शतकी खेळीसह नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले. होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५५ चेंडूत शतक झळकावले. त्याची ही खेळी ११ चौकार आणि ५ उत्तुंग षटकाराने बहरलेली होती. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी मार्शसह ऑस्ट्रेलियासाठी ही खेळी मोठा दिलासा देणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्डीच्या साथीनं मार्शन तिसऱ्या विकेटसाठी केली विक्रमी भागीदारी
पहिल्यांदा फलंदाजी करताना पर्थ स्कॉर्चर्सची अवस्था बिकट झाली होती. सलामीवीर फिन अॅलन १६ तर कूपर कोनोली अवघ्या ४ धावांवर बाद झाला. ५३ धावांवर २ विकेट्स गमावल्यावर कर्णधार मिचेल मार्शने आरोन हार्डीसोबत तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली. मार्शने केवळ ५८ चेंडूत १०२ धावा केल्या. त्याला उत्तम साथ देताना आरोन हार्डीनेही आक्रमक फलंदाजी करत ४३ चेंडूत ९४ धावा कुटल्या. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर पर्थ स्कॉर्चर्सने निर्धारित २० षटकांत ३ बाद २२९ धावा करत होबार्ट संघाविरुद्ध तगडे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना होबार्टचा संघ १८९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. मार्शच्या संघाने ४० धावांनी हा सामना खिशात घातला.
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड
२०० धावांचा पल्लाही गाठला
या शतकी खेळीसह मिचेल मार्शने बिग बॅश लीगमधील २००० धावांचा टप्पाही पार केला आहे. आतापर्यंत ७६ सामन्यांत त्याने २०३१ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. खास गोष्ट ही की, या सर्व धावा त्याने पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून खेळतानाच केल्या आहेत. गेल्या काही सामन्यात त्याचा फॉर्म गायब झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण टी-२० वर्ल्ड कपसाठी खांद्यावर नेतृत्वाची धूरा पडताच तो पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे.