Harmanpreet Kaur Becomes Most Capped Player In Women’s International Cricket : भारतातीय महिला संघाला वर्ल्ड चॅम्पियन करणारी कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑस्ट्रेलियन मैदानात नवा इतिहास रचला आहे. भारतीय महिल संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील दुसरा टी-२० सामना कॅनबेरा येथील मनुका ओवलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच हरमनप्रीत कौरनं विश्वविक्रमाला गवसणी घातली. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आता हरमनप्रीतच्या नावे झाला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
न्यूझीलंडच्या सुझीला मागे टाकत हरमनप्रीत कौरनं रचला नवा इतिहास
३६ वर्षी हरमनप्रीत कौर कॅनबेरा येथील मैदानात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३५६ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला (Suzie Bates) मागे टाकले आहे. सुझीनं आपल्या कारकिर्दीत ३५५ आंतरराष्ट्रीय सामने खेळे आहेत.
T20 World Cup: पाकिस्तानचा साहिबजादा फरहान विराट कोहलीला विक्रम मोडणार? एवढ्या धावांनी गरज
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारात किती सामने खेळले?
हरमनप्रीतने आतापर्यंत आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १८९ सामने खेळले आहेत. याशिवाय तिच्या नावे १६१ वनडे सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे. तिच्या विश्वविक्रमी कामगिरीत ६ कसोटी सामने खेळल्याचा रेकॉर्डी आहे.
ऑस्ट्रेलियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात, दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिका नावे करण्याची संधी
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत विजयी सलामी देत ऑस्ट्रेलिया दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून एक कसोटी सामनाही नियोजित आहे.
महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने
- हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) (भारत) – ३५६
- सुझी बेट्स (Suzie Bates) (न्यूझीलंड) – ३५५
- एलिसा पेरी (Ellyse Perry) (ऑस्ट्रेलिया) – ३४९
- मिताली राज (Mithali Raj) (भारत) – ३३३
- शार्लट एडवर्ड्स (Charlotte Edwards) (इंग्लंड) – ३०९
Web Summary : Harmanpreet Kaur sets a record, playing her 356th international match, surpassing Suzie Bates. India eyes series win against Australia after a strong start. Kaur has played 189 T20s, 161 ODIs and 6 Tests.
Web Summary : हरमनप्रीत कौर ने 356वां अंतर्राष्ट्रीय मैच खेलकर सुजी बेट्स को पछाड़ा और एक रिकॉर्ड बनाया। भारत की नजरें मजबूत शुरुआत के बाद ऑस्ट्रेलिया के खिलाफ श्रृंखला जीतने पर हैं। कौर ने 189 टी20, 161 वनडे और 6 टेस्ट खेले हैं।