Australia vs South Africa 2nd ODI, Matthew Breetzke One More World Record : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवयसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाकडून मॅथ्यू ब्रीट्झके (Matthew Breetzke) याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीये. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील मकेच्या ग्रेट बॅरिअर रीफ अरेना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नियमित कर्णधार टेम्बा बवुमाच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या एडन मार्कम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण डावाची सुरुवात करताना मार्करम खातेही न उघडता तंबूत फिरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आणखी एक विश्वविक्रम
रियान रिकल्टनसह मार्करमच्या रुपात अवघ्या २३ धावांवर पहिल्या दोन विकेट्स गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मॅथ्यू ब्रीट्झके (Matthew Breetzke) च्या खेळीनं दिलासा मिळाला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेत सलग अर्धशतकी खेळीसह वनडेतील पदार्पणात सर्वाधिक २९७ धावांचा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झके याने आणखी एक अर्धशतक झळकावत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यातील अर्धशतकासह वनडेत पदार्पणानंतर प्रत्येक सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विश्व विक्रम त्याच्या नावे झालाय.
Matthew Breetzke : आफ्रिकेच्या पठ्ठ्याची कमाल! २९० धावांसह वनडेत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
आतापर्यंत कुणाला नाही जमलं ते मॅथ्यू ब्रीट्झकेनं करून दाखवलं
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून वनडेतील पदार्पणाच्या सामन्यात मॅथ्यू ब्रीट्झके याने १४८ चेंडूत १५० धावांची खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध त्याने दुसरा सामना खेळला. या सामन्यात त्याच्या भात्यातून ८४ चेंडूत ८३ धावांची खेळी आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत त्याने ५६ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली होती. आता दुसऱ्या वनडेत आणखी एक फिफ्टी प्लसचा डाव साधत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या भात्यातून ७८ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ८८ धावा आल्या. या कामगिरीसह वनडे क्रिकेटच्या इतिहासात तो पहिला खेळाडू ठरलाय ज्याने पहिल्या चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.