Australia Vs Pakistan : २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तान दौरा, ४ मार्चपासून मालिका

Australia Vs Pakistan : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ २४ वर्षांनंतर यंदा पाकिस्तान दौरा करणार आहे. ४ मार्चपासून सुरू होत असलेल्या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-२० सामना खेळला जाईल. ५ एप्रिल रोजी टी-२० सामन्याने दौऱ्याची सांगता होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 09:52 AM2022-02-05T09:52:00+5:302022-02-05T10:00:05+5:30

whatsapp join usJoin us
Australia Vs Pakistan: Australia to tour Pakistan after 24 years, series from March 4 | Australia Vs Pakistan : २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तान दौरा, ४ मार्चपासून मालिका

Australia Vs Pakistan : २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तान दौरा, ४ मार्चपासून मालिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ २४ वर्षांनंतर यंदा पाकिस्तान दौरा करणार आहे. ४ मार्चपासून सुरू होत असलेल्या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-२० सामना खेळला जाईल. ५ एप्रिल रोजी टी-२० सामन्याने दौऱ्याची सांगता होईल.
 क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि पीसीबी यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली.  याआधी १९९८ ला  मार्क टेलरच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दौरा केला होता.  तीन सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली होती. ४ फेब्रुवरीला ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाच्या बैठकीत पाकिस्तान दौऱ्याच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली होती. यानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ ४ मार्चला पहिला कसोटी सामना खेळेल. त्यानंंतर एकदिवसीय मालिका पार पडेल. दौऱ्यातील शेवटचा सामना ५ एप्रिल टी-२० स्वरुपात खेळविण्यात येईल.
दौऱ्याला मंजुरी मिळताच सीएचे सीईओ निक हॉकले म्हणाले, ‘मी पीसीबी, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार मानतो.  २४ वर्षांनंतर दौऱ्यास मंजुरी लाभली आहे. ही ऐतिहासिक संधी असून खेळाडू, सपोर्ट स्टाफ, सुरक्षा तज्ज्ञ आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू संघटनांचेही आभार. आम्ही दोन विश्व दर्जाच्या संघांदरम्यान उच्च दर्जाचा खेळ पाहायला उत्सुक आहोत.’
पाकिस्तानात क्रिकेट संघांची सुरक्षा हा नेहमी चिंतेचा विषय असतो. २००९ ला लाहोरमध्ये श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात कुणाचाही जीव गेला नाही; मात्र काही खेळाडू जखमी झाले होते.  यानंतर सर्वच संघांनी पाकचा दौरा करण्यास नकार दिला. पाकिस्तान आपले स्थानिक सामने यूएईत खेळायचा. गेल्या काही वर्षांपासून पाकमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू झाले. द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे या संघांनी पाकिस्तानात सामने खेळले. काही दिवसांआधी मात्र न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण देत ऐनवेळी खेळण्यास नकार दिला होता.

रावळपिंडीत ५ सामने
मालिकेतील पहिली कसोटी रावळपिंडी येथे, तर अखेरचे दोन कसोटी सामने कराची आणि लाहोरमध्ये होतील. उभय संघांमधील सातपैकी पाच सामने रावळपिंडीत होतील. तीन वन डे आणि टी-२० सामन्यांचे आयोजनदेखील रावळपिंडी येथे होईल.  ऑस्ट्रेलिया संघ २७ फेब्रुवारी रोजी इस्लामाबादला पोहोचेल. सर्व खेळाडू एक दिवस क्वारंटाईन राहतील.

ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक
n पहिली कसोटी ४ ते ८ मार्च रावळपिंडी
n दुसरी कसोटी १२ ते १६ मार्च कराची
n तिसरी कसोटी  २१ ते २५ मार्च लाहोर
n पहिला वन डे २९ मार्च रावळपिंडी
n दुसरा वन डे ३१ मार्च  रावळपिंडी
n तिसरा वन डे २ एप्रिल रावळपिंडी
n टी-२० सामना ५ एप्रिल रावळपिंडी

Web Title: Australia Vs Pakistan: Australia to tour Pakistan after 24 years, series from March 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.