AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy Set Record With Maiden Century मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात २१ वर्षीय नितीश कुमार रेड्डीनं विक्रमी सेंच्युरी झळकावली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरलाय. विशेष म्हणजे त्याने आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याची ही सेंच्युरी अन्य फलंदाजांच्या तुलनेत एकदम खास ठरते.
आधी अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला
आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीनं आधी अनिल कुंबळे या दिग्गजाचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना भारताकडून सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड अनिल कुंबळे यांच्या नावे होता. २००८ मध्ये दिग्गज खेळाडूच्या भात्यातून ऑस्ट्रेलियात ८७ धावांची खेळी आली होती. चौथ्या कसोटी सामन्यात ८८ धावा करताच नितीश कुमार रेड्डीनं अनिल कुंबळेंचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरनं कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. दुसरीकडे नितीश रेड्डीनं कारकिर्दीतील पहिलं वहिल शतक साजरे केले.
MCG च्या मैदानातील सेंच्युरीसह सचिन, विराटसह या दिग्गजांच्या खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
भारताकडून बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानात सर्वाधिक २ शतके झळकवण्याचा विक्रम हा अजिंक्य रहाणेच्या नावे आहे. या मैदानात बॉक्सिंग डे कसोटीत पहिल शतक हे मास्टर ब्लास्टरच्या भात्यातून आले होते. या दोघांशिवाय विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनीही या मैदानात बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती.
बॉक्सिंग डे कसोटीत शतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज
- दिलीप वेंगसरकर १०२ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज (१९८७) ईडन गार्डन, कोलकाता
- कपिल देव १२९ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१९९२) सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
- मोहम्मद अझरुद्दीन १०३ धावा विरुद्ध न्यूझीलंड (१९९८) बेसिन रिझर्व, न्यू झीलँडच्या वेलिंग्टन
- सचिन तेंडुलकर ११३ धावा विरुद्ध न्यूझीलंड (१९९८) बेसिन रिझर्व, न्यू झीलँडच्या वेलिंग्टन
- सचिन तेंडुलकर ११६ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९९९) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- विरेंद्र सेहवाग १९५ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००३) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- विराट कोहली १६९ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१४) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- अजिंक्य रहाणे १४७ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१४) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- चेतेश्वर पुजारा १०६ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१८) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- अजिंक्य रहाणे ११२ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१८) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- लोकेश राहुल १०२ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२१) सेंच्युरियन
- लोकेश राहुल १०१ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२३) सेंच्युरियन