Australia vs England, 1st Ashes Test Mitchell Starc claims a record with his 100th wicket Joe Root : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात आपल्या पहिल्या स्पेलमध्ये मिचेल स्टार्कनं कहर केला. पहिल्या षटकातच त्याने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राउली याला तंबूचा रस्ता दाखवला. एवढ्यावरच न थांबता त्याने ६ षटकात १७ धावा खर्च करत आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद केले. बेन डकेटला आउट केल्यावर जो रुटला खातेही न उघडता तंबूत धाडत मिचेल स्टार्कनं विकेट्सचे विक्रमी 'शतक' साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
असा पराक्रम करणारा करणारा पहिला गोलंदाज
पर्थच्या मैदानातील सामन्यात मिचेल स्टार्कनं इंग्लंडच्या आघाडी फळीतील फलंदाजीला सुरुंग लावताना रुटच्या विकेटच्या रुपात अॅशेस कसोटी मालिकेत १०० विकेट्स पूर्ण केल्या. अॅशेस कसोटीत शंभर विकेट्सचा पल्ला गाठणारा तो २१ वा गोलंदाज ठरला. २१ गोलंदाजात स्टार्क एकमेवर डावखुरा जलदगती गोलंदाज आहे ज्याने १०० विकेट्सचा डाव साधला आहे. त्यामुळे या कामगिरीसह त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली.
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
जो रुटच्या पदरी भोपळा; नवव्यांदा स्टार्कच्या जाळ्यात फसला
मिचेल स्टार्कनं कसोटी क्रिकेटमध्ये ९ व्या वेळी जो रुटची शिकार केली आहे. इंग्लंडच्या डावातील नवव्या षटकात जो रुट स्लिपमध्ये झेल देऊन तंबूत परतला. त्याला खातेही उघडता आले नाही. यंदाच्या वर्षातील रुटच्या पदरी पहिल्यांदाच भोपळा पदरी पडला आहे. रुटला सर्वाधिक वेळा आउट करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. जड्डूनेही रुटला ९ वेळा बाद केले आहे. जोश हेजलवूडनं १० वेळा तर बुमराह आणि पॅट कमिन्स यांनी रुटला प्रत्येकी ११-११ वेळा तंबूत धाडले आहे.
अॅशेसच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- शेन वॉर्न- १९५
- ग्लेन मॅकग्रा- १५७
- स्टुअर्ट ब्रॉड- १५३
- ह्यू ट्रम्बल- १४१
- डेनिस लिली- १२८
- इयान बॉथम- १२८
- बॉब विलिस- १२३
- जेम्स अँडरसन- ११७
- मोंटी नोबल- ११५
- रे लिंडवॉल- ११४
- नाथन लायन- ११०
- विल्फ्रेड रोड्स- १०९
- सिडनी बार्न्स- १०६
- क्लेरी ग्रिमेट- १०६
- एलेक बेडसर- १०४
- बिल ओ'रेली- १०२
- चार्ली टर्नर- १०१
- बॉबी पील- १०१
- जॉर्ज गिफेन- १०१
- टेरी एल्डरमॅन- १००
- मिचेल स्टार्क- १००*