Australia vs England 5th Ashes Test Steve Smith 37th Test Century Breaks Rahul Dravid Record : ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कार्यवाहू कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात शतक साजरे केले. फेब्रुवारी २०२५ नंतर १३ डावांनंतर त्याच्या बॅटमधून शतकी खेळी पाहायला मिळाली. कसोटी कारकिर्दीतील ३७ व्या आणि अॅशेस कसोटीतील १३ व्या शतकासह त्याने मोठा डाव साधला आहे. या कामगिरीसह अनेक विक्रम मोडीत काढताना त्याने भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडलाही मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्टीव्ह स्मिथची सेंच्युरी ठरली विक्रमी
स्टीव्ह स्मिथचं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेच्या इतिहासातील हे १४ वे शतक ठरले. यासह त्याने शुभमन गिल (१० शतके) याच्यासह अनेक दिग्गजांना मागे टाकलं. तसेच केन विल्यमसन, ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन (प्रत्येकी ११ शतके) यांनाही त्याने मागे टाकले आहे.
Travis Head चं आयकॉनिक शतकी सेलिब्रेशन; स्टँडमधील सुंदरीनंही लुटली मैफील (VIDEO)
ICC WTC च्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकवणारे फलंदाज
- जो रूट (इंग्लंड) - २३
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - १४
- केन विल्यमसन (न्यूझीलंड)- ११
- ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) - ११
- मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) - ११
- शुभमन गिल (भारत) - १०
- हॅरी ब्रूक (इंग्लंड)- ९
- रोहित शर्मा (भारत) - ९
WTC इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्टीव स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत ४५२४ धावा* जमा आहेत.
- जो रूट - ६४७४ धावा
- स्टीव्ह स्मिथ- ४५२४* धावा
- मार्नस लाबुशेन- ४४४७ धावा
- ट्रॅव्हिस हेड- ३९०० धावा
- बेन स्टोक्स - ३७९९ धावा
राहुल द्रविडलाही टाकले मागे
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ शतके झळकावली आहेत. ३७ व्या शतकासह या यादीत स्टीव्ह स्मिथ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सिडनी कसोटीत झळकावलेल्या शतकासह त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविडनं आपल्या कसोटी कारकिर्दीत ३६ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज
- ५१- सचिन तेंडुलकर
- ४५- जॅक कॅलिस
- ४१ -रिकी पाँटिंग
- ४१ - जो रूट
- ३८ - कुमार संगकारा
- ३७- स्टीव्ह स्मिथ
- ३६- राहुल द्रविड
पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात ५१८ धावा करत सामन्यात १३४ धावांची आघाडी घेतली होती. स्टीव्ह स्मिथ २०५ चेंडूत १२९ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला वेबस्टर ५८ चेंडूत ४८ धावांवर खेळत होता.