Australia vs England 4th Ashes Melbourne Boxing day Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. मालिका आधीच गमावलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस टंग आणि गस ॲटकिन्सन यांनी गोलंदाजीत चमक दाखवत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. उपहारापर्यंत यजमान ऑस्ट्रेलियन संघाने आघाडीच्या चार विकेट्स अगदी स्वस्तात गमावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या ५१ धावांवर ४ विकेट्स!
ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर अवघ्या २७ धावा असताना गस ॲटकिन्सन याने सलामीवीर ट्रॅविस हेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. हेड २२ चेंडूत २ चौकारासह १२ धावा करुन माघारी फिरला. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करणारा जेक वेदरल्ड याला जोश टंग (Josh Tongue) आपल्या जाळ्यात अडकवले. २३ चेंडूत १० धावा करून तो बाद झाला. मार्नस लाबुशेन ६ (१९) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९ (३१) धावा करून स्वस्तात बाद झाले. या दोघांची विकेटही जोश टंगनेच घेतली. ५१ धावांवर ऑस्ट्रेलियाच्या आघाडी फळीतील चार गडी माघारी फिरले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने ४ विकेट्सच्या बदल्यात ७२ धावा केल्या होत्या.
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
संघ अडचणीत असताना उस्मान ख्वाजा आणि ॲलेक्स कॅरी जोडी जमली, पण...
संघ अडचणीत असताना उस्मान ख्वाजानं मैदानात तग धरला. पण गस ॲटकिन्सन याने लंचनंतर त्यालाही जेमी स्मिथकरवी झेलबाद करत ऑस्ट्रेलिया आणखी एक धक्का दिला. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या डावात २९ धावांची भर घातली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर ॲलेक्स कॅरीच्या रुपात ऑस्ट्रेलिया सहावा धक्का दिला. त्याने ३५ चेंडूत २० धावांची खेळी केली.
जोश टंगनं बेस्ट स्पेलसह साधला पाच विकेट्सचा डाव
जोश टंग याने आपल्या भेदक माऱ्यासह तळाच्या फलंदाजांनाही फार काळ टिकू दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ३५ धावांची खेळी करणाऱ्या मायकेल नेसर (Michael Neser) सह जोश टंगने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधला. ११.२ षटकात ४५ धावा खर्च करत या पाच विकेट्स घेतल्या. याशिवाय गस ॲटकिन्सन याने २ तर बेन स्टोक्स आणि ब्रायडन क्रास यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५२ धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाचा पलटवार, इंग्लंडची आघाडीचे फलंदाजही फ्लॉप
यजमान ऑस्ट्रेलियाला फक्त १५२ धावांत आटोल्यावर इंग्लंडच्या संघाने फलंदाजीला सुरुवात केली. पण पहिल्या डावात स्टार्क आणि मायकेल नेसर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत अवघ्या १६ धावांवर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. झॅक क्राउल ५(१४), बेन डकेट २ (५) आणि जकॉब बाथेल १ (५) माघारी फिरल्यावर जो रुट १५ चेंडूचा सामना करून खाते न उघडता बाद झाला.
Web Summary : Josh Tongue's five wickets helped England dismiss Australia for 152. However, England's top order collapsed, struggling against Starc and Neser, leaving them in a precarious position.
Web Summary : जोश टंग के पांच विकेटों से इंग्लैंड ने ऑस्ट्रेलिया को 152 पर समेट दिया। जवाब में स्टार्क और नेसर के सामने इंग्लैंड के शीर्ष क्रम की बल्लेबाजी लड़खड़ा गई।