Australia vs England 2nd Ashes Test Mitchell Starc Created History : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन डावखुरा जलदगती गोलंदाजी मिचेल स्टार्क याने मोठा डाव साधला आहे. या सामन्याच्या पहिल्याच षटकात स्टार्कनं बेन डकेटला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपलाही स्टार्कनं याच षटकात बाद केले. तोही खाते उघडू शकला नाही. या दोन विकेट्स खात्यात जमा करताच स्टार्कंनं इतिहास रचला. डे नाईट कसोटी सामन्यात एका संघाविरुद्ध २० विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. एवढेच नव्हे तर त्याने पाकिस्तानचा दिग्गज वासीम अक्रम याचा विक्रमही मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आणखी भक्कम
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या षटकात दोन विकेट्स घेत स्टार्कनं अनेक विक्रम आपल्या नावे केले. कसोटी सामन्यात पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा आकडा त्याने २६ वर नेला आहे. या यादीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन १९ विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या केमार रोच याने पहिल्या षटकात १० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क
पिंक बॉल टेस्टमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्क आता अव्वलस्थानी विराजमान झाला आहेय इंग्लंडविरुद्ध त्याने आतापर्यंत ६ डावात २० विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धही १७ विकेट्स घेण्याचा पराक्र स्टार्कच्या नावेच आहे. त्यापाठोपाठ या यादीत कॅरेबियन जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक बॉल टेस्टमध्ये त्याने ६ डावात १६ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
वसीम अक्रमचा विक्रमही मोडला
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांच्या यादीत स्टार्क आता अव्वलस्थानी पोहचला आहे. आतापर्यंत १०२ सामन्यात त्याने ४१५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात १७ वेळा ५ विकेट्स आणि ३ वेळा १० विकेट्स घेतल्याची नोंद आहे. वसीम अक्रम याने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०४ सामन्यात ४१४ विकेट्स घेतल्या होत्या.