Joe Root First Century in Australia After Grace Hayden Comic Appeal : इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुटनं ब्रिस्बेनच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी साकारली. इंग्लंडच्या डावातील ६६ व्या षटकात बोलंडच्या गोलंदाजीवर चौकार मारत त्याने कसोटीतील ४० वे शतक साजरे केले. या खेळीसह त्याने विश्वविक्रमही आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियन मैदानातील कसोटीत त्याच्या बॅटमधून आलेली ही पहिली सेंच्युरी ठरली. त्यामुळे त्याचे हे शतक आणखी खास ठरते. या कामगिरीचा आनंद इंग्लंडच्या बॅटरपेक्षा आणखी कुणाला झाला असेल तर ती आहे ऑस्ट्रेलियन सुंदरी ग्रेस हेडन (Grace Hayden).
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हेडनच्या लेकीचा तो मेसेज अन् जो रुटच्या शतकी दुष्काळा संपला
अॅशेस कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर मॅथ्यू हेडन याने एक मोठं वक्तव्य केले होते. ज्याची चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर त्याची लेक आणि स्पोर्ट्स अँकर ग्रेस हेडन हिने जो रुटला खास मेसेज लिहिला आणि अखेर जो रुटचा ऑस्ट्रेलियातील शतकी दुष्काळ संपला. काय आहे ही स्टोरी जाणून घेऊयात सविस्तर
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
मॅथ्यू हेडनच्या बोल्ड कमेंटनंतर चर्चेत आली होती तिची पोस्ट
![]()
इंग्लंडच्या मध्यफळीतील फलंदाज जो रुट हा कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅशेस कसोटी मालिकेत तो शतक झळकावेल, अशी मोठी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन याने केली होती. एवढेच नाही तर या माजी क्रिकेटरनं आपल्या संघाविरुद्ध जर जो रुटनं शतक केले नाही तर विवस्त्र हाऊन मैदानातून फिरेन अस वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर हेडनची लेक आणि स्पोर्ट्स अँकरच्या रुपात चर्चित असलेला चेहरा ग्रेस हेडन हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो रुटला मेन्शन करत प्लीज जो रुट यावेळी 'शतक कर...' अशी मजेशीर अंदाजात विनवणी केली होती. जो रुटनंही ऑस्ट्रेलियन सुंदरीचा मेसेज मनावर घेतल्याचे दिसते. त्याने ऑस्ट्रेलियन मैदानात अखेर पहिले कसोटी शतक झळकावत खास इतिहास रचला आहे.
रुटनं सेट केला सर्वात कमी वयात ४० शतके झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन मैदानात पहिले कसोटी शतक झळकावताना जो रुटनं नवा इतिहास रचला आहे. सर्वात कमी वयात कसोटीत ४० शतके झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता इंग्लंडच्या या बॅटरच्या नावे झाला आहे. त्याने ३४ वर्षे आणि ३३९ दिवस वयात हा टप्पा गाठला आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिसच्या नावे होता. त्याने ३५ वर्षे आणि ७९ दिवस इतके वय असताना कसोटीत ४० शतके झळकावली होती.