स्मिथ, वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत : शर्मा

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ७१ वर्षांनी मालिका जिंकत इतिहास घडवला होता. मात्र त्यावेळच्या संघात वॉर्नर व स्मिथ दोघेही संघात नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:57 AM2020-04-23T00:57:32+5:302020-04-23T01:00:01+5:30

whatsapp join usJoin us
Australia tour With Steve Smith and David Warner back Rohit Sharma expects different ball game | स्मिथ, वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत : शर्मा

स्मिथ, वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत : शर्मा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नर व स्टिव्हन स्मिथ यांच्या संघातील पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियन संघ मजबूत झाला असून, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा मागील दौऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले.

भारताने २०१८-१९ मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केले होते. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ७१ वर्षांनी मालिका जिंकत इतिहास घडवला होता. मात्र त्यावेळच्या संघात वॉर्नर व स्मिथ दोघेही संघात नव्हते. या दोघांवर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

रोहित म्हणाला,‘मी न्यूझीलंड दौºयाची चांगली तयारी केली होती, मात्र दुर्दैवाने त्याचवेळी दुखापत झाल्याने मी संघाबाहेर राहिलो.’ तो म्हणाला, ‘मला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन कसोटी खेळण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. या दोन खेळाडूंच्या उपस्थितीत त्यांच्या मैदानावर खेळणे पूर्णपणे वेगळे असणार आहे.’

रोहितच्या मते, त्याला डावाची सुरुवात करणे आवडते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने सलामीला येऊन चांगली सुरुवात केली होती. आॅस्ट्रेलियात २०१८ मध्ये झालेल्या दौºयातही त्याची सलामीला खेळण्याची तयारी होती. त्याने यासंदर्भात संघव्यवस्थापनाला कल्पनाही दिली होती. रोहित म्हणाला, ‘मला सांगण्यात आले होते की, कसोटी सामन्यात तुला सलामीला खेळावे लागेल. ही गोष्ट दोन वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हापासून स्वत:ला तयार करत होतो.’ तो म्हणाला, ‘ड्रेसिंग रुममध्ये बसून सामना पाहण्यात कोणतीही मजा नाही, तुम्हाला संधी हवी असते. प्रत्येकाला खेळपट्टीवर उतरायचे असते. मी पण सामना पाहण्यासाठी आलो नव्हतो. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी तयार होतो. काही तांत्रिक बाबीवर लक्ष देणे गरजेचे होते.’

रोहित म्हणाला की, आॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सर्वात रोमहर्षक असणार आहे. कारण भारतीय संघ सध्या सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. आम्ही संघ म्हणून सर्वात चांगली कामगिरी करत आहोत. प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघाकडून सामना खेचून घेऊ इच्छित असतो. कोविड-१९ महामारीनंतर होणारी ही मालिका सर्वात रोमाचंक असणार आहे.’ भारताला टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी आॅस्ट्रेलियामध्ये जावे लागणार आहे. त्यानंतर कसोटी मालिका होणार आहे.

Web Title: Australia tour With Steve Smith and David Warner back Rohit Sharma expects different ball game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.