Join us

Norma Johnston: ऑस्ट्रेलियाच्या सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटूचे निधन

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 20:16 IST

Open in App

Norma Johnston, Australian CricketL नॉर्मा जॉन्स्टन (née Bhitman) या ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जुनी व वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू यांचे आज निधन झाले. ऑस्ट्रेलियामध्ये महिला क्रिकेटची पाळेमुळे रूजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या आजपर्यंतच्या सर्वात वयस्क खेळाडू होत्या. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नॉर्मा या मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होत्या. १९४८ ते १९५१ या काळात त्यांनी आपल्या देशासाठी सात कसोटी सामने खेळले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केले आहे की, वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालेल्या नॉर्मा जॉन्स्टन यांच्या निधनाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया शोक करत आहे. नॉर्मा यांनी १९४८ ते ५१ मध्ये सात कसोटी सामने खेळले. आज त्यांचा मृत्यू झाला. त्या ऑस्ट्रेलियाच्या सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू होत्या. आमच्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले की, नॉर्मा यांनी देशातील अनेक मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले. निक म्हणाले, "ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी ज्यांना ज्यांना समजली, ते सर्व जण खूपच दुःखी झाले आहेत. त्या एक लीडर होत्या. त्यांनी केवळ एक खेळाडू म्हणूनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठे योगदान दिले नाही, तर हजारो महिला आणि मुलींसाठी त्यांनी एक उत्तम व्यासपीठ देखील तयार केले.

१९४८ मध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या दौऱ्यावर त्यांनी पदार्पण केले. १९५१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी शेवटची कसोटी खेळला. या दरम्यान २५.१६च्या सरासरीने त्यांनी १५१ कसोटी धावा केल्या. त्याशिवाय त्यांनी २२ गडीही तंबूत धाडले.

टॅग्स :ऑफ द फिल्डआॅस्ट्रेलिया
Open in App