Join us

ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवात निसर्गाचे सर्वाधिक नुकसान झाली. जवळपास 50 कोटी प्राणी व पक्षी या आगीत मृत पावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 16:02 IST

Open in App

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवात निसर्गाचे सर्वाधिक नुकसान झाले. जवळपास 50 कोटी प्राणी व पक्षी या आगीत मृत पावले.  या आगीतील पीडितांसाठी आता अनेक हात पुढे सरसावले आहेत. क्रिकेटपटू, टेनिसपटू, फॉर्म्युला वन चालक, अनेक संस्था पीडितांसाठी निधी गोळा करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यानंही पुनर्वसनासाठी त्याच्या मानाच्या 'बॅगी ग्रीन' कॅपचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांत या कॅपवर विक्रमी बोली लागली. हा लिलाव शुक्रवारी बंद झाला आणि वॉर्नच्या त्या कॅपला 1 मिलियन डॉलर म्हणजेच 4.9 कोटी या कॅपला मिळले. ही संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे.

वॉर्ननं सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला,''कॅपसाठी बोली लावणाऱ्या प्रत्येकाचे आभार. यात यशस्वी झालेल्या व्यक्तिचे विशेष आभार. ही बोली माझ्या अपेक्षेपलीकडची होती. ही सर्वच्या सर्व रक्कम ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे. खूप खूप धन्यवाद.''

वॉर्नच्या कॅपचा लिलाव सुरु झाला त्यानंतर फक्त दोन तासांतच 275000 डॉलर एवढी बोली लावली आहे. गुरुवारी या कॅप सर्वाधिक 5 लाख 20 हजार 500 डॉलर एवढी सर्वाधिक बोली लावली गेली आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक क्रिकेटमधील बोली असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सर्वाधिक बोली ही सर डॉन ब्रॅडमन यांच्या कॅपली मिळाली होती. ब्रॅडमन यांच्या कॅपला 4 लाख 25 हजार डॉलर एवढी बोली मिळाली होती. पण हा विक्रम आता वॉर्नच्या कॅपने मोडला आहे.

भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकावर शिक्कामोर्तब धोनीच्या षटकाराने झाले होते. धोनीने ज्या बॅटने षटकार खेचला होता, त्या बॅटचाही काही दिवसांपूर्वी लिलाव झाला होता. धोनीच्या बॅटचा लिलाव जवळपास 2 लाख 50 हजार डॉलरला झाला होता. हे सर्व विक्रम वॉर्नच्या कॅपनं मोडले.

 

टॅग्स :ऑस्ट्रेलिया भीषण आगआॅस्ट्रेलियाआंतरराष्ट्रीय