Join us  

ऑस्ट्रेलिया आग : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर मदतीला धावला, दिसणार मोठ्या भूमिकेत

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 9:33 AM

Open in App

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे, पण आता त्यांना आणखी एका नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आगीने नेस्तानाबुत झालेलं  शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत.

ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत

....म्हणून लोकांना न्यूड फोटो पाठवून पैसे मागू लागली ही प्रसिद्ध मॉडेल, ८ कोटी केले जमा!

ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननं त्याची ग्रीन कॅपचा लिलाव करून जवळपास 4.9 कोटी रक्कम जमा केले. इतकेच नव्हे तर वॉर्न आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी निधी गोळा करण्यासाठी एका क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. त्यात आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरनही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी

तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनाही बोलावण्यात आले होते. पण, सचिन फलंदाज म्हणून नव्हे,तर नव्या भूमिकेत सहभाग घेत ऑस्ट्रेलिया आगीतील पुनर्वसनासाठी मदत करणार आहे. 8 फेब्रुवारीला होणाऱ्या या सामन्यात  तेंडुलकर आणि वेस्ट इंडिडचा महान गोलंदाज कर्टनी वॉल्श हे अनुक्रमे पाँटिंग एकादश आणि वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.   

टॅग्स :ऑस्ट्रेलिया भीषण आगसचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलिया