AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव

संघ अडचणीत असताना अर्धशतक झळकावले, पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:12 IST2026-02-24T11:09:53+5:302026-02-24T11:12:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
AUS W vs IND W 1st ODI Smriti Mandhana Record 11th Fifty Plus Score Against Australia In Women's ODIs | AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव

AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव

Smriti Mandhana Record 11th Fifty Plus Score Against Australia : ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात स्मृती मानधना हिने आश्वासक खेळीनं टीम इंडियाला दिलासा देणारी खेळी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. प्रतिका रावल खातेही  न उघडता माघारी फिरली. तिच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शेफाली वर्मालाही मैदानात तग धरता आला नाही. त्यापाठोपाठ जेमिमा रॉड्रिग्जनंही स्मृतीची साथ सोडली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारी ती पहिली आशियाई महिला क्रिकेट

 संघ अडचणीत असताना स्मृतीनं न डगमगता सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेऊन अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृतीनं ५६ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने अर्धशतक साजरे केले.  वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिच्या बॅटमधून आलेली ही अकरावी फिफ्टी प्लसची खेळी ठरली. आशियातील अन्य कोणत्याही बॅटरकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत अशी कामगिरी केलेली नाही.

"इगो बाजूला ठेव अन्..."; भारताला हरवल्यानंतर आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमच्या विधानाची चर्चा

अर्धशतकाचे शतकात रुपांतर करेल, असे वाटत असताना गमावली विकेट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळीचं ती शतकात रुपांतर करून टीम इंडियाला आणखी भक्कम स्थितीत घेऊन जाईल, असे वाटत होते. पण ताहलिया मॅकग्रा हिने भारताच्या डावातील २४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिला अना किंगकरवी झेलबाद केले. स्मृती मानधना ६८ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. हरमप्रीत कौरच्या साथीनं तिने चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. 

Web Title : स्मृति मंधाना का ऑस्ट्रेलिया के खिलाफ रिकॉर्ड अर्धशतक, भारत को मिली मजबूती।

Web Summary : स्मृति मंधाना के ऑस्ट्रेलिया के खिलाफ शानदार अर्धशतक, जो उनका ग्यारहवां है, ने शुरुआती बल्लेबाजी के झटकों के बाद भारत की पारी को संभाला। वह यह उपलब्धि हासिल करने वाली पहली एशियाई महिला क्रिकेटर हैं।

Web Title : Smriti Mandhana's Record Fifty Against Australia Boosts India's Innings.

Web Summary : Smriti Mandhana's resilient fifty against Australia, her eleventh, provided crucial stability to India's innings after an early batting collapse. She is the first Asian woman cricketer to achieve this feat.