AUS vs SL Steven Smith Has Been Officially Added To Australia T20 World Cup-2026 Squad : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियन संघ दुखापतीनं व्याकूळ आहे. त्यात झिम्बाब्वेच्या संघाने त्यांना पराभवाचं दु:ख दिलं. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवणं अधिक आव्हानात्मक झाले आहे. ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेतील पल्लेकेलेच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध यंदाच्या हंगामातील आपला तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल झाला आहे. बॅकअपच्या रुपात संघात सामील झालेल्या स्टीव्ह स्मिथला उर्वरित स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात सामील करून घेतले आहे. जोश हेजलवूडच्या जागी त्याची संघात एन्ट्री झाली आहे. झिम्बाब्वेनं पराभवाचा धक्का दिल्यावर स्मिथसाठी ऑस्ट्रेलियाने "आयी आयी आयी तेरी याद आयी!..." गाणं वाजवलं. आता याचा संघाला किती फायदा होणार ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॅकअपच्या रुपात संघाला जॉईन झाला, आता प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार एन्ट्री
ICC टेक्निकल कमिटीच्या मंजुरीनंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा भाग झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श पहिल्या दोन सामन्यांमध्ये दुखापतग्रस्त झाल्यावर स्मिथ बॅकअप खेळाडूच्या रुपात श्रीलंकेत पोहचला. आता श्रीलंकेविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
T20 World Cup 2026: मोठ्ठा 'गेम' झाला..!! झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजलं पराभवाचं पाणी
तो ऑस्ट्रेलियासाठी ठरू शकतो ट्रम्प कार्ड
स्मिथने अखेरचा टी २० आंतरराष्ट्रीय सामना २०२४ मध्ये खेळला होता. सिडनी सिक्सर्ससाठी झालेल्या बिग बॅश लीग २०२५-२६ मध्ये तो कमालीच्या फॉर्ममध्ये दिसला. या लीगमध्ये त्याने ५९.८० च्या सरासरीने २९९ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिन संघासाठी तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो. आतापर्यंतच्या कारकिर्दीत स्मिथनं आंतरराष्ट्रीय स्तरावर ६७ टी-२० सामने खेळले असून त्याच्या खात्यात १०९४ धावांची नोंद आहे.
ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर पडण्याची टांगती तलवार
ऑस्ट्रेलियाची संघ ग्रुप-बीमध्ये आहे. आतापर्यंत त्यांनी दोन सामने खेळले असून एक जिंकला आहे आणि एक सामना गमावला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संघाला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. उर्वरित दोन सामन्यातील एक सामना जरी गमावला तर ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेबाहेर पडेल. याचा अर्थ श्रीलंकेविरुद्धची लढत त्यांच्यासाठी करो वा मरोची असेल.
Web Summary : Australia adds Steven Smith to their T20 World Cup squad after a shocking loss to Zimbabwe. He replaces Josh Hazlewood. Smith's inclusion aims to boost the team's chances after a shaky start and injury concerns. Australia faces a must-win situation against Sri Lanka.
Web Summary : ज़िम्बाब्वे से मिली हार के बाद ऑस्ट्रेलिया ने स्टीवन स्मिथ को टी20 विश्व कप टीम में शामिल किया। वह जोश हेज़लवुड की जगह लेंगे। स्मिथ का लक्ष्य टीम की शुरुआत को मज़बूत करना है। श्रीलंका के खिलाफ ऑस्ट्रेलिया के लिए जीत ज़रूरी है।