Australia vs South Africa, 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिका खिशात घातली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याचा वचपा पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत काढला आहे. मॅथ्यू ब्रीट्झके (Matthew Breetzke) याची विक्रमी फिफ्टीसह ट्रिस्टन स्टब्सच्या (Tristan Stubbs) च्या दमदार फलंदाजीच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४९.१ षटकात २७७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करून मालिकेत बरोबरी साधण्याचा ऑस्ट्रेलियाचा डाव फसला. अर्धा संघाने लुंगी एनिगडीसमोर (Lungi Ngidi) गुडघे टेकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जॉश इंग्लिस नडला, पण शेवटी तो एकटा पडला!
२७७ धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा कांगारुच्या ताफ्यातील फलंदाजांनी नांगी टाकली. जॉश इंग्लिसनं केलेल्या ७४ चेंडूतील ८७ धावा वगळता अन्य कोणत्याही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीन याने ५४ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. अर्धा संघ एकेरी धावसंख्येवर तपरता. परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ १९३ धावांत ऑल आउट झाला. याआधीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ धावांचा पाठलाग करताना १९८ धावांत गारद झाला होता. धावाही करू शकला नव्हता.
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
लुंगी एनिगडीनं मारला 'पंजा'
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. नांद्रे बर्गर याने ट्रॅविस हेडला अवघ्या ६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मुल्डरनं कॅप्टन मिच ल मार्शच्या खेळीला १८ धावांवर ब्रेक लावला. मग पिक्चरमध्ये आला एनिगडी. त्याने मार्नस लाबुशेनला अवघ्या एका धावेवर बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या जॉश इंग्लिस याच्यासर ५ विकेट्स घेत एनिगडीनं संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेकडून दोघांची फिफ्टी
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात तशी ऑस्ट्रेलियापेक्षाही खराब झाली होती. पण आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर ब्रीत्झे आणि स्टब्सनं दमदार खेळी केली. थ्यू ब्रीट्झके याने ७८ चेंडूत केलेल्या ८८ धावांच्या विक्रमी खेळीसह स्टब्सनं ८७ चेंडूत ७४ धावा केल्यामुळे संघाला मोठा दिलासा मिळाला अन् शेवटी एनिगडीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सामन्यासह मालिका खिशात घातली.