Australia Clarify Steve Smith Role After Group Stage T20 World Cup 2026 Exit : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला. साखळी फेरीत टी-२० क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या झिम्बाब्वेच्या संघाने कांगारुंची शिकार केली अन् या गटातील समीकरणच बदलली. २००९ नंतर ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच साखळी फेरीत गारद होण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियन संघाच्या ढिसाळ कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संघाच्या पराभवानंतर स्टार बॅटर स्टीव स्मिथचा मुद्दा अधिक चर्चेत आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेत बोलवून त्याला न खेळवणं हा दिग्गजाचा अपमान आहे, असे आरोपही कण्यात आला. हा मुद्दा चांगलाच तापत असताना साखळी फेरीतील ओमानविरुद्धच्या अखेरच्या लढतीआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ऑस्ट्रेलियन निवड समितीकडून स्पष्टीकरण, ते नेमकं काय म्हणाले?
स्टीव्ह स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघावर लाजिरवाणी वेळ आली, अशी टीका होत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे निवडकर्ता टोनी डोडेमेड यांनी सांगितले की, स्टीव्ह स्मिथला बॅकअप खेळाडूच्या रुपात श्रीलंकेत बोलवण्यात आले होते. कर्णधार मिचेल मार्श (Mitchell Marsh) ग्रोइन दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकल्यावर स्मिथला पर्यायी खेळाडूच्या रुपात संघात सामील करुन घेतले. त्यानंतर वेगवान गोलंदाज जोश हेजलवूज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्यावर स्मिथला मुख्य संघात स्थान देण्यात आले. डोडेमाइड यांनी स्पष्ट केले की, तिसऱ्या सामन्यात मार्श आणि ट्रॅविस हेड जोडीनं चांगली कामगिरी केली. त्यामुळेच आम्ही संघात बदल करण्याचा विचार केला नाही.
T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनाचा जुना फोटो VIRAL
स्मिथसोबत जे घडलं ते चुकीच; या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी मांडली रोखठोक भूमिका
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार मार्क वॉ याने स्टीव्ह स्मिथला संघातून बाहेर ठेवणं हा त्याचा अपमान केल्यासारखे आहे, असे म्हटले आहे. मॅथ्यू हेडन आणि ग्लेन मेग्रा या दिग्गजांनीही स्मिथआधी अष्टपैलू कॅमरूनला दिलेली पसंती ही रणनिती ऑस्ट्रेलियाला कमकुवत करणारी ठरली, असे मत व्यक्त केले आहे. स्मिथ याने बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी केली होती. एका शतकासह त्याने २०२५-२६ च्या हंगामात २९९ धावा केल्या होत्या. तरीही त्याला ऑस्ट्रेलियन संघाने किंमत दिली नाही, हे आश्चर्यकारक आहे, अशा प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.