India vs Australia, 4th Test : भारतीय खेळाडूंना करावी लागतेय टॉयलेटची सफाई, खोलीत केलंय प्रत्येकाला बंद

India vs Australia, 4th Test : हे संपूर्ण हॉटेल रिकामी आहे, परंतु खेळाडूंना येथील स्विमिंग पूल व जिमसह कोणत्याच सुविधांचा लाभ घेता येत नाही. हॉटेलमधील कॅफे व रेस्टॉरंट्स बंद आहेत, असे भारतीय संघातील सदस्याने सांगितले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 12, 2021 03:27 PM2021-01-12T15:27:03+5:302021-01-12T15:30:22+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND : Indian players reportedly locked in rooms, cleaning toilets on their own in Brisbane hotel | India vs Australia, 4th Test : भारतीय खेळाडूंना करावी लागतेय टॉयलेटची सफाई, खोलीत केलंय प्रत्येकाला बंद

India vs Australia, 4th Test : भारतीय खेळाडूंना करावी लागतेय टॉयलेटची सफाई, खोलीत केलंय प्रत्येकाला बंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे15 जानेवारीपासून चौथ्या कसोटीला होणार सुरुवातभारतीय संघावर दुखापतीचं सावट गडद

India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीवर कोरोना व्हायरसमुळे संकट होते. त्यातही भारतीय संघ तेथे दाखल झाला आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाईन नियमांत सूट मिळालेली नाही. सिडनी कसोटीनंतर भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन येथे दाखल झाला आहे आणि इथे त्यांच्या अडचणींत अजून वाढ झाली आहे.  'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का!

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन येथे दाखल झाला आणि येथील सोफीटेल हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. गॅबा स्टेडियमपासून पाच किलोमीटर अंतरावर हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे. हे हॉटेल चांगले आहे, परंतु येथे कैद्याप्रमाणे रहावे लागत आहे. ''आम्हाला रुममध्ये बंद करण्यात आले आहे. स्वतःला बिछाना नीट करावा लागत आहे. टॉयलेटही स्वतःच साफ करत आहोत. नजिकच्या भारतीय रेस्टॉरंटमधून आमच्यासाठी जेवण मागवलं जातं आणि फ्लोअरवर ते दिले जाते. आम्ही फ्लोअरसोडून कुठेच जाऊ शकत नाही,'' असे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात सांगितले आहे. टीम मॅनेजमेंट जसप्रीत बुमराहच्या करिअरशी खेळणार?; मयांक अग्रवालचेही खेळणे अनिश्चित

हे संपूर्ण हॉटेल रिकामी आहे, परंतु खेळाडूंना येथील स्विमिंग पूल व जिमसह कोणत्याच सुविधांचा लाभ घेता येत नाही. हॉटेलमधील कॅफे व रेस्टॉरंट्स बंद आहेत, असे भारतीय संघातील सदस्याने सांगितले आहे. ''ब्रिस्बेनध्ये एकही कोरोना रुग्ण नाही, तरीही खेळाडूंना रुमबाहेर पडता येत नाही. भारतीय संघ आधीच दुखापतींशी झगडत आहे. त्यांना मुलभूत सुविधा, जशा स्विमिंग पूल व जिम यांचा वापर करण्यास मिळाले तर ते अडचणींवर मात करू शकतील. हॉटेलमध्ये एकही अन्य पाहुणा नाही. मग, खेळाडूंना का परवानगी दिली जात नाही?,''असे सवाल करण्यात येत आहे.

ब्रिस्बेनमध्ये मिळत असलेल्या या वागणुकीवर भारतीय संघ व्यवस्थापन नाखूश आहे आणि त्यांनी ही सर्व परिस्थिती BCCIच्या कानावर टाकली आहे.''त्यांनी आम्हाला जे वचन दिले होते आणि इथे जी वागणूक मिळतेय ती परस्परविरोधी आहे. या दौऱ्यापूर्वी बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या. 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यास खेळाडूंना मुलभूत सुविधा दिल्या जातील, इत्यादी. आता आम्हाला स्वतः बिछाना घालावा लागत आहे. टॉयलेट साफ करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येतील तेव्हा BCCI अशी वागणूक देईल का?,''असेही विचारण्यात येत आहे. रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांची माघार; चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियासमोर लिमिटेड ऑप्शन!

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सध्याच्या BCCI व्यवस्थापन कमकुवत असल्याचेही म्हटले आहे.  
 

Web Title: AUS vs IND : Indian players reportedly locked in rooms, cleaning toilets on their own in Brisbane hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.