Join us

टी ब्रेकनंतर Heart Break! टीम इंडियानं ९ धावांत गमावल्या ३ विकेट्स; अन्...

सगळं काही सुरळीत सुरुये असं वाटत असताना मॅच पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:32 IST

Open in App

AUS vs IND 4th Test Day 5 India Lost Their 3 Wickets Just 9 Runs : मेलबर्न कसोटी सामन्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल एकटा पडल्याचा सीन पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियानं  दिलेल्या ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं आधी २५ धावांत आघाडीच्या तीन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर पंत आणि यशस्वी जोडी जमली. दोघांची खेळीनं टीम इंडियाला दिलासा दिला. पण पंतची विकेट पडली अन् सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरला. भारतीय संघानं १२१ धावांवर पंतच्या रुपात चौथी विकेट गमावली. पार्ट टाइम बॉलरन ही जोडी फोडल्यावर बोलँड आणि लायन यांनी टीम इंडियाला धक्क्याव धक्के दिले. रवींद्र जडेजा आणि पहिल्या डावातील शतकवीर हजेरी लावून परतले. परिणामी टीम इंडियानं १३० धावांवर सहावी विकेट गमावली. तिसऱ्या सेशनमध्ये टी ब्रेकनंतर टीम इंडियानं अवघ्या अर्ध्या तासांत ९ धावांमध्ये या ३ विकेट्स गमावल्या.

संयमी अंदाजात खेळणाऱ्या रिषभ पंतनं बदलला मूड, अन्...

तिसऱ्या सत्राआधीच्या टी-ब्रेकपर्यंत अगदी संयमी अंदाजात खेळणाऱ्या पंतनं ब्रेकनंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो फसला अन् त्याच्यासोबत टीम इंडिया पुन्हा अडचणीत सापडली.  पंतनं घेतलेला फटकेबाजीचा निर्णय ड्रेसिंग रुममध्ये शिजलेल्या प्लानचा भाग होता का? हा देखील एक प्रश्नच आहे. पण त्याचा हा निर्णय टीम इंडियाची धाकधूक वाढवणारा ठरला. 

त्याची जागा घेण्यासाठी जड्डू आला अन् तोही स्वस्तात माघारी फिरला

रवींद्र जडेजानं १४ चेंडूचा सामना केला. पण बोलँडनं उसळत्या चेंडूवर त्याला चकवा दिला. तो २ धावा करून तंबूत परतला. पहिल्या डावात जडेजानं ५१ चेंडूत १७ धावा केल्या होत्या. किमान या खेळीची पुनरावृत्ती होण अपेक्षित होत. पण त्याला ते जमलं नाही.  त्याची विकेट टीम इंडियाच्या अडचणी वाढवून ऑस्ट्रेलियाला मॅचमध्ये आणणारी होती. यात  नितीशकुमार रेड्डीच्या विकेट्सची भर पडली.

नितीशकुमार रेड्डीची विकेट

पहिल्या डावात दमदार शतकी खेळीसह टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलेला नितीशकुमार रेड्डी लायनच्या गोलंदाजीवर फसला. ही ५ चेंडूचा सामना करुन तो एका धावेवर बाद झाला अन् अर्ध्या तासांत सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजून फिरला. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरिषभ पंतरवींद्र जडेजा