Join us

Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

श्रेयस अय्यरनं क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा दाखवून देत कॅरीला झेलबाद केले. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:03 IST

Open in App

Shreyas Iyer Take Brilliant Catch But He Suffers Injury :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरनं अफलातून झेल टिपत ऑस्ट्रेलियाची सेट झालेली जोडी फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १२४ धावांवर आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यावर रॅनशो आणि अ‍ॅलेक्स कॅरी ही जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असताना श्रेयस अय्यरनं क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा दाखवून देत कॅरीला झेलबाद केले. पण ऑस्ट्रेलियन बॅटर  कॅरीसोबत श्रेयस अय्यरवरही मैदान सोडण्याची वेळ आली. मैदानात नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

श्रेयस अय्यरनं घेतला जबरदस्त कॅच, पण..

ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३४ व्या षटकात हर्षित राणा गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर अ‍ॅलेक्स कॅरीनं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेऊन चेंडू फटका उंच हवेत उडाला. श्रेयस अय्यरनं  बॅकवर्ड पॉईंटवरून मागच्या दिशेला पळत जात हवेत उडी मारून हा झेल टिपला. जमीनीवर पडल्यावर चेंडू हातून निसटला, पण झेल यशस्वी पूर्ण करत अय्यरनं ऑस्ट्रेलियाची सेट झालेली जोडी फोडली. अय्यरनं घेतलेल्या या सुपर झेलसह एका बाजूला टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला, पण दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन बॅटरसह श्रेयस अय्यरवरही मैदान सोडण्याची वेळ आली.  झेल घेताना त्याला झालेली दुखापत टीम इंडियाच्या ताफ्यात चिंता निर्माण करणारी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shreyas Iyer's Catch, Injury Sidelines Him and Australian Batter!

Web Summary : Shreyas Iyer's brilliant catch broke Australia's partnership, but he suffered an injury. While taking the catch, Iyer hurt himself, forcing him off the field alongside Carey, raising concerns for Team India.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाश्रेयस अय्यर