AUS vs ENG Ashes Test Series Joe Root Breaks Kapil Devs Unwanted World Record : अॅशेस कसोटी मालिकेतील ब्रिस्बेनच्या मैदानातील गाबाच्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. या सामन्यात इंग्लंडचा महान फलंदाज जो रुटनं ऑस्ट्रेलियन मैदानातील शतकी दुष्काळ संपवत विश्वविक्रमी शतक झळकावले. सर्वात कमी वयात त्याने कसोटीत ४० वे शतक झळकवण्याचा पराक्रम केला. पण संघाला ८ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे जो रुटच्या नावे लाजिरवाण्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. जो रुटनं नको त्या बाबतीत भारताचे माजी कर्णधार कपिल पाजींना मागे टाकले आहे. जाणून घेऊयात त्या रेकॉर्डबद्दल सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी सामने खेळूनही विजयाची पाटी कोरीच
पर्थच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या इंग्लंडच्या संघाला गाबाच्या मैदानातही पराभव पदरी पडला. त्यामुळे पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला आहे. जो रुटसाठी ऑस्ट्रेलियातील मैदानात हा १६ वा सामना होता. त्याने शतकी खेळीसह ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावले. पण इथं सर्वाधिक सामने खेळून एकही कसोटी सामना न जिंकणारा खेळाडू असा टॅग त्याला लागला आहे. ऑस्ट्रेलियात जो रुटनं खेळलेल्या १६ सामन्यात इंग्लंडच्या संघाला १४ पराभवाचा सामना करावा लागला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत. याआधी हा लाजिरवाणा विश्वविक्रम भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावे होता.
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
कपिल देव यांच्यावर पाकिस्तान विरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
या आधी एका देशात सर्वाधिक सामने खेळून एकही सामना न जिंकण्याचा लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्ड हा कपिल देव यांच्या नावे होता. पाकिस्तानमध्ये १५ कसोटी सामन्यातील २२ डावात त्यांनी २६.१० च्या सरासरीने ५४८ धावा आणि ४०.०२ च्या सरासरीने ४४ विकेट घेतल्या होत्या. पण या १५ पैकी एकाही सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाला नव्हता. ५ सामन्यात पराभव तर १० सामने अनिर्णित राहिल्याचा रेकॉर्ड होता. जो रुटनं याबाबतीत कपिल पाजींना मागे टाकले आहे.