Sachin Tendulkar vs Joe Root : इंग्लंडचा महान फलंदाज जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये कमालीच्या कामगिरीसह सुसाट वेगानं मास्टर ब्लास्टर सचिन तेडुंलकरच्या विक्रमाचा पाठलाग करताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळीसह जो रुटनं आपली खास छाप सोडली आहे. अॅशेस कसोटी मालिकेतील ब्रिस्बेनच्या मैदानात ऑस्ट्रेलियन मैदानात त्याच्या बॅटमधून पहिले वहिले शतक आले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील शतकी खेळीसह जो रुट सर्वात कमी वयात कसोटीत ४० शतकांचा पल्ला गाठला. आता त्याच्या नजरा या शतकांच्या अर्धशतकाकडे आहेत. यापुढे जाऊन त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कसोटीतल सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. पण खरंच त्याला या विक्रमाला गवसणी घालता येईल का? त्यासाठी त्याला काय करावे लागेल? किती वेळात तो या महारेकॉर्डपर्यंत पोहचू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेत विराट कोहलीनं क्रिकेटच्या देवाला टाकलं मागे; कसोटीत जो रुट सुसाट वेगानं करतोय पाठलाग
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक झळकवणारा एकमेव फलंदाज असलेल्या सचिन तेंडुलकरनं आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ शतके झळकावली आहे. कसोटीत शतकांच अर्धशतक झळकवणारा तो एकमेव बॅटर आहे. सचिन तेंडुलकरनं आपल्या वनडे कारकिर्दीत ४९ शतके झळकावली आहेत. वनडेत विराट कोहलीनं क्रिकेटच्या देवाला ओव्हरटेक करत सर्वाधिक ५३ शतके आपल्या नावे केली आहेत. आता कसोटीत जो रुट सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डचा सुसाट वेगाने पाठलाग करताना दिसत आहे.
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
जो रुटला सचिनचा रेकॉर्ड मोडणं शक्य होईल का? त्यासाठी त्याला काय करावे लागेल?
इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट हा सध्याच्या घडीला कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. एवढेच नाही तर वयाच्या पस्तीशीत त्याने कसोटीत ४० शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरला मागे टाकण्यासाठी या फॉरमॅटमध्ये त्याला आणखी १२ शतके झळकावयची आहेत. २०२१ पासून तो कमालीच्या वेगाने शतके झळकावताना दिसला आहे. त्यामुळे सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा सर्वकालिन विक्रम तो अगदी सहज पार करेल असे वाटते.
५ डावात एक शतक मारतोच
२०२१ ते २०२४ या कालावधीत जो रुटनं ९१ डावात १८ शतके झळकावली आहेत. पाच डावात त्याच्या बॅटमधून एक शतक असे समीकरण पाहायला मिळाले. या गतीने तो वर्षात किमान ३-४ शतके सहज करेल. जो रुटचा आलेख घसरला आणि त्याने वर्षाला फक्त ३-४ शतके केली तरी सचिनच्या पुढे जाण्यासाठी आवश्यक १२ शतकांसाठी त्याला ३-४ वर्षे लागतील. सध्याचे त्याचे वय फक्त ३५ आहे. त्यामुळे तो हा विक्रम सहज आपल्या नावे करु शकतो. जर शतकांचा वेग वाढला तर यापेक्षाही कमी वेळात तो मोठा डाव साधू शकतो.