Marnus Labuschagne Became 1st Batsman To Score 1000 Runs Pink Ball Test : अॅशेस कसोटी मालिकेतील ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात जो रुटनं विक्रमी शतकी खेळीसह पहिला दिवस गाजवला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ३३४ धावांवर आटोपला. जो रुटनं या डावात नाबाद १३८ धावांची खेळी साकारली. इंग्लंडवर पलटवार करताना ऑस्ट्रेलियन संघाने दमदार फलंदाजीचा नजराणा दाखवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळीसह मार्नस लाबुशेन याने नवा इतिहास रचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मार्नस लाबुशेन याने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
कसोटीतील वनडे अप्रोचसह ऑस्ट्रेलियन संघाने ६० षटकांच्या आत धावफलकावर ३०० पार धावसंख्या लावली. ७८ चेंडूत केलेल्या ७२ धावांच्या खेळीसह मार्नस लाबुशेन ६५ (७८) आणि स्टीव्ह स्मिथ ६१ (८५) यांच्या बॅटमधून अर्धशतकी आली. पहिल्या डावातील अर्धशतकी खेळीसह मार्नस लाबुशेन याने खास विक्रमाला गवसणी घातली. दिवस रात्र कसोटी सामन्यात १००० धावांचा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
धावांचा संघर्ष संपला, अन्....
अॅशेस कसोटी मालिकेआधी मार्नस लाबुशेन हा धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाले. २०२३ नंतर त्याच्या भात्यातून एकही शतक आलेले नाही. ऑस्ट्रेलिया -इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेआधी ७ डावात तो एकदाही ३० धावसंख्येच्या पुढे गेला नव्हता. पण या मालिकेतून त्याने दमदार कमबॅक केले आहे. पर्थच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळीसह नवा इतिहास रचला. ब्रिस्बेनच्या मैदानातील सामन्यात त्याने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६५ धावांची जबरदस्त खेळी साकारली.
डे-नाईट कसोटीत फलंदाजांसाठी असतं मोठं आव्हान, पण मार्नस लाबुशेन यानं केली कमाल
मार्नस लाबुशेन दिवस रात्र कसोटीत सामन्यात १००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. २०१९ मध्ये तो पिंक बॉल टेस्ट खेळला होता. केवळ १० सामन्यांतील १६ व्या डावात त्याने १००० धावांचा पल्ला गाठला आहे. आतापर्यंत त्याने ६३. ९३ च्या सरासरीसह १०२३ धावा काढल्या आहेत. यात ४ शतकासह एका अर्धशतकाचा समावेश आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये बेस्ट फलंदाजी करणं ही काही सोपी गोष्ट नाही. कसोटीत ५५ पेक्षा अधिक सरासरीनं धावा करणारा स्टीव्ह स्मिथ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण रात्र दिवस कसोटी सामन्यात त्याची सरासरी ४० पेक्षा कमी आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत डेविड वॉर्न आणि ट्रॅविस हेड यांचा नंबर लागतो.