Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथिया शेट्टी - के. एल. राहुल बांधणार लग्नगाठ?

अथिया आणि के. एल. राहुल यांचं नातं लपलेलं नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे जगजाहीर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 09:45 IST

Open in App

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वामध्ये जणू लग्नाचं वारंच वाहत आहे. एकापाठोपाठ एक कलाकार आणि क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकत आहेत. आलिया-रणबीरच्या बिग वेडिंगनंतर आता पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल लवकरच लग्न करणार आहेत. त्यांचा वेडिंग प्लॅनसुद्धा तयार असल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे दाक्षिणात्य पद्धतीने लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, या दोघांनीही आपल्या लग्नाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. 

अथिया आणि के. एल. राहुल यांचं नातं लपलेलं नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे जगजाहीर आहे. दोघेही सतत एकेमकांसोबत सुटीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. आथिया लोकेश राहुलसोबत अनेक सामन्यांसाठी विदेश दौरा करत असते. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुललग्न
Open in App